Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

अष्टविनायका तुझा महिमा कसा, आज जाणून घेऊया महाराष्ट्र संदेश न्युजसह मोरगावचा मोरेश्वराची महिमा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 20, 2023
in धर्म, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
अष्टविनायका तुझा महिमा कसा, आज जाणून घेऊया महाराष्ट्र संदेश न्युजसह मोरगावचा मोरेश्वराची महिमा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अष्टविनायक विशेष लेख:- राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक घरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवमुळे लहान मोठ्या सह सर्वत्र आनंदाच वातावरणात निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्यात गणपतीची प्रसिद्ध अष्टविनायक ठिकाणे आहेत. या गणेशोत्सवात महाराष्ट्र संदेश न्युज तर्फे आपण या सर्व अष्टविनायकांची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण बघणार आहोत अष्टविनायका तुझा महिमा कसा, आज जाणून घेऊया गणपती मोरगावचा मोरेश्वराची महिमा.

मोरगावचा प्रसिद्ध मोरेश्वर गणपती हा गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीला श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. मोरगाव हे श्री गणेशाचे आद्यपीठ आहे असे म्हटले जाते. थोर गणपतीभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणपतीचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. श्री समर्थ रामदास स्वामींना सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती याच मंदिरात स्फुरली होती असं म्हटलं जातं. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे देवस्थान आहे. मोरगाव बारामतीपासून 38 किलोमीटर अंतरावर आहे.

मोरेश्वराच्या मंदिराचे वैशिष्ट्ये..
मोरेगाव येथील मोरेश्वराचे गणपतीचं मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात, बेंबीत हिरे आहेत, तर मस्तकावर नागराजाचा फणा आहे. गणपतीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत आणि समोर उंदीर आणि मोर आहेत. हे मंदिर बहामनी काळात बांधलेले आहे. गावाच्या मध्यभागी हे मंदिर असून त्याच्या चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात अनेक ठिकाणी मंदिरं उद्धवस्त करण्यात आली होती. त्यामुळे या मंदिरावर आक्रमण होऊ नये म्हणून त्याला मशिदीसारखा आकार देण्यात आला आहे.

असे पडले मोरेश्वर नाव…
एका आख्यायिकेनुसार सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी गणपतीला आवाहन केले. त्यानंतर गणपतीने मोरावर आरूढ होऊन या ठिकाणी सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हटले जाते. येथील मंदिरात गणपतीसोबत रिद्धी – सिद्धीच्याही मूर्ती आहेत.

ब्रम्हदेवाने दोन वेळा घडवली मूर्ती..
मोराश्वराविषयी एक दंतकथा देखील प्रसिद्ध आहे. ब्रम्हदेवाने दोन वेळा येथील मयूरेश्वराची मूर्ती बनवली असे म्हटले जाते. पहिली मूर्ती बनवल्यावर सिंधुसुराने तोडून टाकली. त्यामुळे ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली. सध्याची मयूरेश्वराची जी मूर्ती आहे, ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. या मंदिरासमोर असलेली नंदीची मूर्ती हे देखील येथील आणखी एक वैशिष्ट् आहे. या मूर्तीविषयी असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी ही नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. परंतु येथे आल्यानंतर रथाचे चाक तुटले आणि ही मूर्ती येथेच ठेवण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

हिंगणघाट: बाप्पा येताना तुला गचके, झटके लागेल, एकदा का हा विकास सापडला की सगळ ठीक होईल!

Next Post

अहेरी: सरपंचाची खोटी स्वाक्षरी करून पंचायत समितीला प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी: सरपंचाची खोटी स्वाक्षरी करून पंचायत समितीला प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.

अहेरी: सरपंचाची खोटी स्वाक्षरी करून पंचायत समितीला प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In