संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:- जिल्हात अवैध रेती उत्खनन करून मोठ्या प्रमाणात तस्करी करून हे रेती तस्कर मालामाल झाले आहे. त्यात नवनवीन युक्त्या करून हे रेती तस्कर पोलीस आणि महसूल विभागाला एक प्रकारे आव्हान देत आहे.
नागपुर जिल्हातील पाटणसावंगी रेती तस्करांनी रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी नवीन फंडा अमलात आणला आहे. सावनेर पोलिसांनी मंगळवारी 19 सप्टेंबर सकाळी 10 वाजता सुमारास सिल्लोरी (तालुका सावनेर) शिवारात केलेल्या कारवाई स्पष्ट झाले. यात चोरटे टिप्पर मध्ये खाली रेती आणि वर राख भरून नेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी राख व रेतीने भरलेला टिप्पर पर जप्त केला आहे.
सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी तेथून कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडाच्या दिशेने रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती सावनेर पोलीस ठाण्याच्या पाटणसावंगी पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील चिल्लोरी हद्दीत नाकाबंदी करून (एमएच ४० वाय -२७७५) क्रमांकाचा टिप्पर अडवला आणि झळती घेतली. सुरुवातीला पोलिसांना या टिप्पर मध्ये राख असल्याचे आढळून आले. मात्र त्यांनी काळजीपूर्वक झडती घेतली असता. खाली रेती असल्याचेही निर्देशास आले. ती रेती विना रॉयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट होतात पोलिसांनी राख, रेती सह टिप्पर जप्त केला. या कारवाईमध्ये एकूण १० लाख ५३ हजाराचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अवैध रेतीची वाहतूक करणारा टिप्पर गुरुकृपा ट्रान्सपोर्ट मालक लक्ष्मण पावडे रा. खापरखेडा ता. सावनेर याच्या मालकीचे असल्यास चौकशीत स्पष्ट झाले. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी कलम ३७९, १०९ गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. त्यांनी ती रेती नेमकी कन्हान नदीच्या कोणत्या घाटातून आणली, त्या घाटात रेती अवैध उपसा कोण करीत आहे. याची माहिती पोलीस घेणार का तसेच दोघासह टिप्पर मालकाच्या कारवाई केली जाणार का. असा प्रश्न ही नागरिकांनी उपस्थित केला आहे. पोलीस व महसूल विभाग हे चोरट्यांच्या पाठीशी उभी आहे असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहे.

