🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.20:- मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत काढल्या जात असलेल्या अमृत कलश यात्रेस संपुर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. देवळी तालुक्यातील मुरदगाव व हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर ग्रामपंचायतीच्यावतीने काढण्यात आलेल्या या यात्रेस विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक घरातून यात्रेदरम्यान माती व तांदुळाचे संकलन करण्यात आले.
देवळी तालुक्यातील ग्रामपंचायत मुरदगाव खोसे व हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेतील मुले तसेच नागरिकांनी सहभागी होत पंचप्रण शपथ घेतली. सायंकाळी कलश व मशाल फेरी काढून मेरी माटी मेरा देश अभियानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक घरातून माती गोळा करून माती कलश व मशाल फेरी पूर्ण करण्यात आली.
मुरदगाव येथील या कार्यक्रमास सरपंच विलास सुरसे, उपसरपंच गजानन हिवरकर, सचिव तृप्ती गावंडे तर अल्लीपुर येथील कार्यक्रमात गट विकास अधिकारी महेश बेहेकर, ठाणेदार प्रफुल्ल डाहूले, सरपंच नितीन चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, सचिव दत्तात्रय दिवटे, मुख्याध्यापिका मंगला गिरमकर, कृषी सहाय्यक पंकज चौधरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका उज्वला गुळगाने यांच्यासह विद्यार्थी, गावकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशाताई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोनही गावात अमृत कलश यात्रेदरम्यान घराघरातून माती गोळा करण्यात आली. भूमिहीन शेतकऱ्यांनी कलशामध्ये चिमुटभर तांदुळ टाकून मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाला सहभाग दिला. शाळेतील मुलांनी कलश हातामध्ये पकडून त्यामध्ये माती जमा करून शपथ घेतली. अशा प्रकारे दोनही गावातील नागरिक व मुलांचा सहभाग मिळाला. गावातून जमा झालेली माती कलशाद्वारे तालुकास्तरावर पोहोचविली जाणार आहे.

