उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:-भिमराजे रुग्णवाहिका संघटना अकोला जिल्हाच्या वतीने शहरातील रुग्णवाहिका मालक चालक यांच्या मागण्याचे निवेदन अकोला महानगर पालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व रुग्णवाहिका मालक चालक आपणास विनंतीपूर्वक निवेदन करतो की, आम्ही मागील १५ ते २० वर्षापासून गरीब गरजु रुग्णाचे सहायता करतो तसेच सरकारी दवाखाना येथे येणारे जिल्हा तसेच ग्रामीण बाहेर गावचे लोकांची मदत करतो.
कोरोना काळात सरकारी दवाखाना तसेच प्रशासनाला तसेच महानगर पालिका प्रशासनाला आम्ही सर्व लोकांनी पूर्ण सहकार्य केले होते व जिल्हा प्रशासनाला आम्ही सर्व निस्वार्थी सहकार्य करतो त्याकरीता आपणास नम्र विंनती आहे की, १८ ते २० रुग्णवाहिकेला दिवस भर सर्वोपचार रुग्णालया समोर उभे करण्यासाठी पार्कींग व्यवस्था देण्यात यावी अशी मागणी भिमराजे रुग्णवाहिका संघटना अकोला जिल्हाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देतेवेळी अर्जुन रविद्र बागडे अध्यक्ष, शेषा मोहम्मद शेख जतीर उपाध्यक्ष, रोशन मेश्राम सचिव, सुभाष ठोस, श्रीकृष्ण तायडे, शेख सलिम, कुणाल दारोकार, मोसिन, शेख नजिर, अर्जुन केवट, जिया खाँ, सचिन गरड, मोहम्मद नकीज, इरफान शौ, अक्षय देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

