संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या प्रतिबंधक असलेले सडलेली सुपारीची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) दक्षता विभागाने मोठी कारवाई करत याचा भांडाफोड केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) दक्षता विभागाला प्राप्त माहितीच्या आधारे कलमना आणि कामठी तालुक्यातील लिहगाव येथे छापे टाकून 3 कोटी 16 लाख 84 हजार 924 रुपये किमतीची 84,527 किलो खाण्याची असुरक्षित आणि कमी दर्जाच्या सडक्या सुपारीचा साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईमुळे सुपारी व्यापारामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने या सडलेल्या सुपारी विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ही धडक मोहीम विभागातर्फे निरंतर सुरूच राहणार आहे असे सांगण्यात आले आहे. प्रशासनास प्राप्त होते असलेल्या सुपारी संदर्भातील तक्रारीच्या आधारे ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेनुसार अन्नसुरक्षा आयुक्त मुंबईचे अभिमन्यू काळे यांच्या आदेशानुसार आणि सहआयुक्त (दक्षता) समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना नागपूर येथील प्रीती इंडस्ट्रीज येथे एकूण 53 लाख 19 हजार 900 रुपये किमतीची 11727 खडकी सुपारी जप्त केली. तसेच कामठी तालुक्यातील लिहगाव येथील फॉर्मको कोल्ड चेन अँड लॉजिस्टिक लि. या कोल्ड स्टोरेजमध्ये विनस ट्रेडर्स, आर. आर. ब्रदर्स, टी एम इंटरप्राईजेस, इमरान सुपारी ट्रेडर्स या इतवारीतील चार फार्मसी 2 कोटी 60 लाख 65 हजार 24 रुपये किमतीचा 72810 किलो निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त करण्यात आली.
ही कारवाई अन्न व औषधी प्रशासन दक्षता विभागाच्या सहाय्यक आयुक्त. आनंद महाजन अन्न सुरक्षा अधिकारी यदुराज दहातोंडे, राजेश यादव, संदीप सूर्यवंशी आणि नागपूर कार्यालयातील अन्नसुरक्षा अधिकारी पियुष मानवटकर, स्मिता बाभरे, अमर सोनटक्के व ललित सोयाम यांनी केली. ही धडक मोहीम नागपूर जिल्ह्यात विविध भागात राबविण्यात येणार आहे.

