हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पोंभूर्णा:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षाचे हात बळकट करण्यासाठी युवासेना सचिव पूर्व विदर्भ शुभम नवले, युवासेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनामद्ये युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर सुर्याभाऊ अडबाले यांच्या आदेशानूसार युवासेना पोंभुर्णा तालुका प्रमुख रजत भाऊ ढोंगे यांच्या नेतृत्वात पोंभुर्णा येथील शासकीय विश्रामगृहात युवासेनेचे आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.
युवासेनाच्या या आढावा बैठकीत अनेक युवकांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुर्याभाऊ अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करत, पक्षाचा प्रसार करण्याचा दृढनिश्चय करत येणाऱ्या काळात पक्षासाठी अहोरात्र झटण्याचा निश्चय केला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित शिवसेना बल्लारपूर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर, शिवसेना तालुका प्रमुख पंकज वड्डेटीवार तर शिवसेना शहर प्रमुख संतोष पालेॅवार, व्यंकटेश सिपावर, सतीश बाऊने, रमेश कुळमेथे, वेदप्रकाश आगरकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास्थळी उपस्थितीत तालुक्यातील सर्व मान्यवरांनी एकजुटीने कसं काम करता येईल या साठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवाकार्यकर्ते सुनिल कावटवार यांनी केले. यावेळी युवासेनेचे राहुल गडपल्लिवार, प्रफुल गवारे, राकेश गाडेकर, अरविंद कोडापे, मयूर गाडेकर, अनुराग बघेल, रोहन आत्राम, योगेश पिपरे, संकेत मडावी, प्रज्वल जाधव, अविचल जाधव, साहिल तलांडे आदी युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.

