Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: आई झाली हैवान, आपल्याच पोटच्या 39 दिवसांच्या बाळाला 14 मजली बिल्डिंगमधून खाली फेकले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 23, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: आई झाली हैवान, आपल्याच पोटच्या 39 दिवसांच्या बाळाला 14 मजली बिल्डिंगमधून खाली फेकले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंगेश जगताप, मुंबई शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाइन मुंबई:- येथील मुलुंड येथून खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका क्रूर आईने आपल्या पोटच्या 39 दिवसांच्या बाळाला 14 मजली बिल्डिंगमधून खाली फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात या चिमुकल्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुलुंड परिसरात खळबळ माजली आहे. तर पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरू केला आहे. ज्यामधून, आई मानसिक तणावात असल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

मुलुंड येथील निळकंठ अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये मनाली मेहता नावाची महिला सुरतहून आपल्या माहेरी आली होती. काही दिवसांपूर्वीच मनालीचे वडीलाचे निधन झाले होते. ज्यामुळे ती मानसिक धक्क्यातून बाहेर आली नव्हती. मनालीच्या वडिलांचा तिच्या बाळावर खूप जीव होता. त्यामुळे बाळाला पाहिल्यानंतर मनालीला सतत वडिलांची आठवण येत होती. मानसिक तणावाचा मनालीवर एवढा परिणाम झाला होता की ती सतत म्हणायची, बाळाला तिचे आजोबा बोलवत आहेत. परंतु घरचे तिची सध्या समजूत काढत होते.

त्यानंतर काल मध्यरात्री पहाटे 4.00 वाजण्याच्या सुमारास उठली आणि तिने आपल्या 39 दिवसांच्या बाळाला बेडरूमच्या खिडकीमधून बाहेर खाली फेकून दिले. हे बाळ थेट बिल्डिंगच्या खाली असलेल्या एका दुकानावर पडले. सकाळी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हे बाळ दुकानाच्या छतावर पडलेले पाहिले. त्यानंतर त्वरित पोलिसांची संपर्क साधला गेला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बाळ ताब्यात घेतले. परिसरात चौकशी केल्यानंतर हे बाळ म्हणाले ते असल्याचे सिद्ध झाले.

दरम्यान, या सर्व घटनेचा तपास करताना पोलिसांना आढळून आले की, वडिलांच्या निधनाचा मनालीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे तिच्यावर वैद्यकीय उपचार देखील सुरू होते. मनालीने यापूर्वी देखील आपल्या पहिल्या बाळाला गमावले होते. त्यानंतर आता पुन्हा मनालीच्या 39 दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटनेचा मनालीला देखील तितकाच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तिच्यावर तक्रार दाखल करण्यात आली असून वैद्यकीय उपचार प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

Previous Post

परतूर: सातारा वाहेगाव येथील रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार नवीन रेशन कार्ड धारकांना दुकानातून दिले हाकलून.

Next Post

सुर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोंभूर्णा युवा सेनेची आढावा बैठक तथा पक्ष प्रवेश संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सुर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोंभूर्णा युवा सेनेची आढावा बैठक तथा पक्ष प्रवेश संपन्न.

सुर्या अडबाले युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोंभूर्णा युवा सेनेची आढावा बैठक तथा पक्ष प्रवेश संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In