पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरात गणेशोत्सव साजरा होत असून हडपसर पोलीस ठाणे हद्दीत भाजी मंडई, गाडीतळ परिसरात लोकांची सामान खरेदी साठी लगबग चालु असते. याच दरम्यान मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी अमलदार यांना मिटींग घेवून त्याबाबत सूचना दिल्या होत्या.
तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत टोणपे, अजित मदने, अनिरूध्द सोनवणे असे पोलीस मित्र यांचे सोबत गाडीतळ बस स्टॉप, हडपसर भाजी मंडई भागात पेट्रोलॉग करीत असताना तपासपथकातील अंमलदार प्रशांत टोणपे व अजित मदने यांना गोपनीय माहीती मिळाली की, मोबाईल चोरी करणारे संशयीत हे गांधी चौक येथे थांबले आहेत. हडपसर तपासपथकाने सापळा रचून आरोपी नामे १) कौशल मुना रावत वय २१ वर्ष रा. बंगलाबाजार, चारबाग रेल्वेस्टेशन जवळ, लखनौ राज्य उत्तरप्रदेश २) मंतोषसिंग श्रवण सिंह वय २२ वर्ष रा. बाबूपुर, तिनपहार रेल्वेस्टेशन जवळ जिल्हा सायरगंज राज्य झारखंड ३) जोगेश्वर कुमार रतन महतो ऊर्फ मोनीया वय ३० वर्ष रा. बाबूपुर, तिनपहार रेल्वेस्टेशन जवळ जिल्हा सायरगंज राज्य झारखंड ४) सुरज रामलाल महाता वय ३० वर्ष रा. बाबुपुर, तिनपहार रेल्वेस्टेशन जवळ जिल्हा सायरगंज राज्य झारखंड ५) एक विधीसंघर्षित बालक रा. पंडेश्वर आसनौर जिल्हा वर्धमान पश्चिम बंगाल यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांचे ताब्यात २० मोबाईल हॅन्डसेट हे मिळून आले आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवा दरम्यान गर्दी अधिक असते व त्यादरम्यान मोबाईल चोरी करण्याकरीता ते १५ सप्टेंबर रोजी लखनौ स्टेशन येथे एकत्र भेटले व त्यानंतर दिनांक २०/०९/२०२३ रोजी पुणे शहर स्टेशन येथे रेल्वे ने आले. त्यानंतर त्यांनी पुणे शहरात हडपसर, बंडगार्डन, स्वारगेट, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत गर्दीचा फायदा घेवून मोबाईल केले चोरी केले असल्याचे सांगीतले. हडपसर तपास पथकाने आरोपीकडून आज रोजी पर्यंत हडपसर पोलीस ठाणेकडील ०४ गुन्हे उघडकीस आहेत. आरोपीकडून कि.रू. ३००,०००/- चे २० मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास
अंकुश बनसुडे पोलीस नाईक हडपसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सा, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे सो पानि, (गुन्हे), श्री. संदीप शिवले सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अमलदार, पोलोस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रंजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख, पोलीस मित्र अविनाश ढगे, शुभम खाडे, कावेरी फाळके, पुनम काळे, प्रतिक माने यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
