अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, दि. 25 सप्टेंबर:- सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर च्या प्रारंगणात तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी रामरावजी मोवाडे, राजूभाऊ घुगल, प्रा.योगेश पाटील, रत्नाकर डहाके पाटील संचालक सावनेर पब्लिक स्कूल, अशोक चव्हाण तालुका क्रीडा सचिव, प्रीतम टेकाडे, योगेश लोकरे सर, शर्मा सर, सौ.ममता अग्रवाल प्राचार्या सीबीएसई बोर्ड, सौ.वैशाली देशपांडे प्राचार्या स्टेट बोर्ड, क्रीडा शिक्षक श्री.चंद्रकांत कोमुजवार सर, अक्षय घोरमारे सर, अमोल जीवतोडे व उपस्थित सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक, स्पर्धक विद्यार्थी, सदर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये एकूण 22 शाळेच्या संघांनी सहभाग घेतला होता. सदर शाळेच्या 14 वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत पहिला क्रमांक सावनेर पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनीने पटकाविला तर 14 वर्ष वयोगटातील मुले रनअप विजेता ठरले. 17 वर्ष वयोगटातील मुली रनअप विजेता.19 वर्ष वयोगटातील मुली रणअप विजेत्या ठरल्या.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे, सचिव डॉ. सौ. प्रतिभा जीवतोडे, संचालक रत्नाकरजी डहाके पाटील, शाळेच्या प्राध्यापिका सौ. ममता अग्रवाल, सौ. वैशाली देशपांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृन्द यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

