पेरमिली संच प्रमुख संदीप मडावी व समितीचे सहकार्य
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली दि. 23 सप्टेंबर:- एकल विद्यालय अभियान अंचल.आलापल्ली संच. पेरमिली येथे गौरी सुत गणेश विश्वकर्मा मंडळ च्या खुल्या पटांगणात संच स्तरीय खेल कूद समारोह संपन्न झाला . या समारोह त पेरमल्ली संचातील सर्व विद्यालय यातील आचार्य, खेडाळू यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी संच समिती सदस्य सत्यनारायण चंदनखेडे, रविंद्र आऊतकर, भिकाराम मडावी, सुधाकर आत्राम, महीला संच समिती सदस्य सावित्रीबाई चंदनखेडे, अनुसया हजारे, कोटेश्र्वरी येलेवार, गौरुबाई हजारे, सुगंधा मडावी, निर्मला मडावी, दर्शना हजारे, रंजना हजारे, पुजा चंदनखेडे अंजली हजारे, निर्मला कोसरे, युवा संच समिती. रीतिक मडावी, सनथ चंदनखेडे, आकाश मित्रावर, राजेंद्र मडावी, कुणाल हजारे, इंद्रजित मेश्राम, सूरज हजारे, अर्णव चंदनखेडे, अविनाश चंदनखेडे इत्यादी सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन साईनाथ चंदनखेडे गौरी सुत गणेश विश्वकर्मा मंडळ पेरमिली अध्यक्ष यांनी केले. दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बुरमवार अंचल ग्राम स्वराज मंच प्रमुख यांनी केले. यावेळी प्रास्ताविकेत खेल कूद समारोह च्या प्रत्येक स्तराची माहिती, खेळाचे महत्त्व, एकल अभियानाची व्याप्ती, अभ्युदय युथ क्लब बद्दल सविस्तर माहिती प्रास्ताविकेतून देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन करून खेळाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कबड्डी, रनींग, लांब उडी, इत्यादी खेळ घेण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थांनी व खेळाडूणी आवडीने सहभाग घेतले. सदर कार्यक्रमाला संचातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
या एकल अभियान अंचल आलापल्ली चे अंचल ग्राम स्वराज मंच प्रमुख महेश बुरमवार, अंचल कार्यालय प्रमुख दिलीप सेडमाके, संच प्रमुख संदीप मडावी व आचार्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सर्वाचे आभार मानण्यात आले.

