पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हात जोरदार पाऊसामुळे झालेल्या अतिवृष्टी मुळे नदी व नाल्यांना पूर आल्याने शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली. हजारो एकर क्षेत्रावरील पिकांची प्रचंड हानी झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
भिवापुर तालुक्यातील मालेवाड़ी येथील देवांगना संजय भोयर यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराने मोठे नुकसान झालं आहे. तोंडा जवळ आलेला घास या पुरात वाहून गेला. त्यामुळे त्यांनी शासनाकडून नुकसान भरपाईसाठी मागणी केली. पण त्याच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. त्यामुळे आज त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे देवांगना संजय भोयर या महिला शेतकरी यांनी नागपुर शहरातील संविधान चौक येथे पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या की ,एकेकड़े आपन बघातो आहे की महाराष्ट्र सरकार द्वारा शुरू असलेला उपक्रम पुरग्रस्त नागरिकासाठी सुरू असलेल्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्या प्रकारे शेतकऱ्या पर्यंत ही योजना पोचत आहे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मी भीवापुर मधिल मालेवाड़ा या गावची रहवासी आहे, माझ्या शेतात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पीक खराब झाले आहे. पण स्थानिक प्रशासनाने कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत शासन प्रशासना कडून मिळाली नाही.
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. पुरामुळे जमीन खरडून जाऊन शेतात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सर्वत्र गाळ साचलेला असल्याने या शेतात दुबार पेरणी करता येत नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, नापिकी यामुळे शेतकऱ्यांसमोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

