पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध तक्रारदार यांनी त्यांची ऑनलाईन व्यवहारातुन फसवणुक झालेबाबत सायबर तपास पथक लोणीकंद यांस तक्रार दिलेली होती. मा. वपोनि विश्वजीत काईगडे सो यांचे मार्गदर्शपर सुचनेप्रमाणे सायबर तपास पथकाचे पोउपनि सुरज गोरे व पथक विविध तक्रारीचे अनुषंगाने काम करीत असताना तक्रारदार नामे अशोक शर्मा यांचे दिनांक ०४/०७/२०२३ रोजी त्यांचे संमतीशिवाय व ओ.टी.पी. शेअर केल्याविना ८८.३६७.२४/- रुपयांचे क्रेडीट कार्ड द्वारे फसवणुक झालेली होती त्यांचे रकमेचे निरीक्षण केले असता सदरचा व्यवहार पे पल मर्चंटला झालेचे निदर्शनास आलेवरुन सायबर तपास पथकाने विनाविलंब आवश्यक कंपन्यांचे नोडल ऑफिसर्स यांना संपर्क करुन तसेच तातडीने पे पल मर्चंट यांना ई-मेल द्वारे माहीती देऊन पाठपुराव्याने तक्रारदारांचे संपुर्ण पैसे परत केले. तसेच तक्रारदार नामे दिलीप जरांगे यांचे दिनांक ०६/०९/२०२३ रोजी ०६,५००/- व तक्रादार पूजा शिंदे यांची दिनांक २३/०८/२०२२ रोजी फोन पे मधुन बोलत असुन रिवार्ड देण्याचे बहाण्याने ०४,०००/- रुपयांची फसवणुक झालेली होती तीनही तक्रारदार यांचे संपुर्ण पैसे रिफंड करुन देण्यात लोणीकंद सायबर तपास पथकास यश आलेले आहे. तक्रारदारांनी लोणीकंद सायबर तपास पथक यांचे आभार मानले. सायबर तक्रारीचे अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइगडे सो यांचे सायबर तक्रारीत अडकलेल्या नागरिकांसाठी जाहीर आवाहन…
सायबर फसवणुक झालेस घाबरून न जाता प्रथमतः विनाविलंब पैसे वाचविण्या करीता / मनी ट्रेल शोधण्याकरीता अशा व्यक्तीने सायबर क्राईम पोर्टल https://cybercrime.gov.in/ यावर सविस्तर अकांऊट ओपन करुन पूर्ण ट्रान्झेक्शनची माहीती भरावी व अॅप्लिकेशन सबमीट करावे तसेच सदर तक्रार नोंद करीत असताना काही अडचण आलेस टोल फ्रि सायबर हेल्पलाईन नंबर १९३० यावर अधिक माहीती / मदत घ्यावी पुढील कारवाई करीता सदरची कॉपी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे सबमीट करावी सायबर तपास पथक आपले फसवणुक झालेल्या व्यवहारांची छाननी करून त्यावर कायदेशीर कारवाई करेल.
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मा. श्री रंजनकुमार शर्मा सो मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ०४ श्री. शशिकांत बोराटे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. संजय पाटील सो, लोणीकंद पोलीस स्टेशन मा. चपनि श्री विश्वजीत काईगडे सो, पोनि गुन्हे श्री. मारुती पाटील सो, पोनि गुन्हे श्रीमती सीमा ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोस्टे सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांनी केलेली आहे.

