पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- दिनांक 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपुरात काही निवडक विदर्भातील चार नेत्यांनी आणि महाराष्ट्रातील फसवे विश्वास घातक अशा काही नेत्यांनी मिळून त्या दिवशी नागपूर करार करून विदर्भाला आधी मुंबई- गुजरातसह द्विभाषकाला जोडण्यात आले, ते वर्ष 1956. त्यानंतर 1960 मध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून महाराष्ट्र राज्याचे निर्मिती करण्यात आली.
आमचे गुजराती बंधू आधीच हुशार, व्यापारी वृत्तीचे म्हणून त्यांनी द्विभाषिकातून गुजराती राज्य वेगळे केले. नागपूर करारात ज्या अटी होत्या त्या अकरा अटी पैकी एकही अट विदर्भाला पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाळण्यात आलेले नाही आणि हे होणारच होते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्य वर्तविले होते. विदर्भाची फसवणूक झाली हे विदर्भातील लोकांना कधीच कळून चुकले. विदर्भातील नेत्यांना सुद्धा ते कळलेले आहे पण विदर्भातील स्वार्थी नेते यांना दिल्ली आणि मुंबईचं लोभ सोडवत नाही आणि अनेक वेळा विदर्भ वेगळा झाला पाहिजे असे बोलून चंद्रपूर पासून गोंदियापर्यंत आणि आमगाव पासून खामगाव पर्यंत सभा घेऊन बोलले पण कृतीत मात्र शून्य.
आज दिनांक 28 सप्टेंबर 2023 ला अनेक संघटना व लहान मोठे राजकीय पक्ष मिळून विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्ये सामील होऊन माजी आमदार वामनराव चटप व मुख्यत्वे जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यात नागपूर कराराची होळी करण्यात आल्याची बातमी आहे.
आता तरी घटनेतील कलम 3 च्या आधारे भारत सरकारने विदर्भाला महाराष्ट्रातून वेगळे करून द्यावे. विदर्भ वेगळे झाल्यानंतर कोणत्या पार्टीचे राज्य विदर्भात होईल याचा अंदाज घेण्यापेक्षा संबंधिताने आधी विदर्भ वेगळा करून द्यायला पाहिजे. विदर्भाचे शेतकरी, बेरोजगार, सुशिक्षित व अशिक्षित हे शांततेने वागत असून आतापर्यंतचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन शांततेने पार पडलेले आहेत याची पण भारत सरकारने दखल घेतली पाहिजे. शांततेने आंदोलन होत आहे याचा अर्थ आंदोलन महत्त्वाचे नाही किंवा तीव्र दिसत नाही असा गैरसमज विदर्भातील, महाराष्ट्रातील किंवा भारत सरकारमध्ये असलेल्या कोणत्याही नेत्यांनी करून घेऊ नये.

