हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गोसीखुर्द येथील नहरात गेलेले तिघेजण नहराच्या पाण्यात जलसमाधी मिळाल्याची घटना सावली येथे शनिवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. नहराच्या पाण्यात वाहून गेल्या पैकी एकाचा मृतदेह आढळून आला असून दोघांची शोध मोहीम सुरू होती.
गणेश विसर्जन करण्यासाठी गोसीखुर्द नहर मध्ये सचिन उर्फ गुरु दिवाकर मोहुर्ले वय 33 वर्ष, किराणा व्यवसायिक, निकेश हरिभाऊ गुंडावार वय 31 वर्ष रा चांदली, संदीप हरीभाऊ गुंडावार वय 27 वर्ष रा चांदली असे नहारात बुडालेल्या युवकांचे नाव आहेत. यापैकी सचिन मोहुर्ले याचा मृतदेह कालच रात्रीच तपास पथकाला मिळून आला. तर दोघांचा तपास सुरू आहे.
जय बजरंग गणेश मंडळातर्फे स्थापन केलेल्या गणेशाची विसर्जन मिरवणूक शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात निघाली. सायंकाळी गणेशाचे विसर्जन करण्यासाठी पाच युवक गोसे खुर्द नहराच्या पाण्यात उतरले. मात्र त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. याबाबतची माहिती होतात सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले. परंतु कोणीही हाती लागले नाही त्यानंतर सावली पोलिसांच्या पथकांनी पाणबुड्यांच्या साह्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी सचिन मोहरले याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. इतर दोघांचा शोध सावली पोलिसांच्या पथकाकडून सुरू आहे.

