डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:- शनिवार (ता.३०सप्टेंबर) रोजी चिखली पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल झाली होती. सिराज अब्दुल हसन खान (धंदा भंगार व्यवसाय गट क्रमांक १६ कमाल वजन काट्यासमोर कुदळवाडी असे अपहरण करून झालेले इसमाचे नाव आहे. तर सैफुद्दीन खान व मोहम्मद अनिस असे अटक केलेल्या इसमांची नावे आहे. या प्रकरणी मयत इसमाचा चुलत मिजाज अहमद अब्दुल हसन खान यांनी बेपत्ता असल्याबाबत तक्रार दिली होती.
पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली पोलीस ठाण्यात सिराज खान यांची मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्य मिसिंग व्यक्तीचा तपास सुरू केला .पोलिसांनी जवळचे नातेवाईक तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेची पाहणी केली असता (ता.२८) रोजी सिराज हा कुदळवाडी येथील जायकाच्या परिसरातून त्याचा मित्र सैफुद्दीन खान यांच्या समावेत दुचाकीवरून मोशी कडे जाताना दिसून आला .पोलिसांनी सैफुद्दीन याला ताब्यात घेतल्यास तर सुरुवातीला तो उडवाउडीची उत्तरे देऊ लागला ,मात्र पोलिसांनी पोलिसी खाकी दाखवताच त्याने गुन्हा कबूत केला.
दोन महिन्यापूर्वी मयत सिराज व माझ्या मध्ये कंपनीचे भंगार घेण्यावरून वाद झाले होते. त्यावेळी सिराजनी मला दमदादी करून कुदळवाडी परिसरात राहणाऱ्या मुलांना मला मारहाण करण्यासाठी पाठवले होते. भविष्यामध्ये माझ्या जीवाला सिराज याच्यापासून धोका होऊन शकतो यामुळे मुंबईतला माझा मित्र मोहम्मद अनिस यास फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर सिराजला भंगार देतो असे खोटे सांगुन दुचाकी वरून चररहोली मिलिटरीच्या ताब्यात असलेल्या जंगलात नेऊन त्याच्या डोक्यात हातोड्याने घाव करून त्याचं खून केला व त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला अशी कबुली आरोपी सैफुद्दीन खान यांनी पोलिसांना दिले आहे. तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुसरा आरोपी मोहम्मद यास चिखली पोलिसांनी मुंबईला जाऊन ताब्यात घेतले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, उपनिरीक्षक बारावकर सहायक पोलिस हवालदार ए.डी.मोरे, हवालदार शिंदे, गर्जे, शिर्के, तारळकर, सी.डी. सावंत, साकोरे ,पोलीस नाईक सुतार व गुन्हे प्रग्टीकरण पथकाने कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.