संदिप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- येथील आंबेडकरी चळवळीतील महिला यांनी आक्रमक पवित्रा घेत नागपुर शहरात असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंबेडकर चळवळीतील शेकडो महिला आज धडकल्या त्यामुळे काही वेळ प्रशासनात खडबड उडाली होती.
करोना महामारीच्या काळात शासनाने नागपुर शहरात अंबाझरी येथे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले सांस्कृतिक भवन अवैधरित्या पाडले त्यामुळे आंबेडकरी समाजात मोठ्या प्रमाणात संताप दिसून येते आहे. त्यामुळे
महिला अनेक दिवसापासून नागपुर येथे जिल्हाधिकारी अंबाझरी आंदोलनस्थळी कधी गेले नाही ते जिल्हाधिकारी विपीन इटणकर फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. तगडा बंदोबस्त लावण्यात आला. फडणवीस यांच्या सरकारने 92 दिवस झाले तरीपण अंबाझरी येथील जमीन वर दिलेले आश्वासन कसलीही प्रतिक्रिया मिळाली नाही त्यामुळे निराश झालेल्या आंबेडकर जनता यांनी आंदोलनाची भूमिका हाती घेतली.
आज रविवार असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला आपल्या निवासस्थानी असतात त्यामुळे आंबेडकरी जनतांनी आंदोलनाचे भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या निवास स्थानी धडक दिली. देवेंद्र फडणवीस हे घरी नव्हत. त्या कारणास्तव पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहले. की खुपिया विभाग विभाग यांना पण या आंदोलनाची माहिती कळालेली नाही यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह राहले. पोलीस अधीक्षक अमितेश कुमार यांच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह झाले आहे.
जे कलेक्टर विपिन इटणकर अंबाझरी येथील आंदोलनच्या ठिकाणी कधी जाऊन पाहिले नाही. ते कसे काय फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले व त्यांनी आंबेडकरी जनतेची समजूत काढली. आता आंबेडकरी जनता फडणवीस यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही. आंबेडकरी जनतेनी बोलतानी सांगितलं की प्रशासननी कोणतीही भूमिका न घेतल्यास 14 ऑक्टोंबर धम्मचक्र परिवर्तन दिवस व 24 ऑक्टोबरला दसरा आहे. संपूर्ण भारतातून लाखोंनी येणारे आंबेडकर समाज यांची मोठी दक्ष घेईल. याचे परिणाम फडणवीस सरकारला दिसतील आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल.

