मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पेट्रोल पंप मधिल नंदोरी चौक येथील मल्हारी पेट्रोल पंपवर ग्राहकाची लूट सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ग्राहकांच्या न कळत सर्रास चुना लावल्या जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, हिंगणघाट शहरात असलेल्या पेट्रोल पंप वर पेट्रोल भरण्यासाठी जवळपास पाच मशिन आहे. काही दिवस आधीपासून या पाच पैकी एक मशीन ही एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल साठी होती आणि त्या मशीन चे दर्शनीय भागावर एक्स्ट्रा प्रीमियम असे लिहिले होते. एक्स्ट्रा प्रीमियम हे पेट्रोल बाकी पेट्रोल पेक्षा अंदाजे सात रूपये महाग आहे. म्हणजे आपणं भरतो ते पेट्रोल १०६/- रूपये लिटर आहे तर एक्स्ट्रा प्रीमियम हे पेट्रोल ११३/- रूपये लिटर आहे. आज या पेट्रोल पंपावरजी एक मशीन एक्स्ट्रा प्रीमियम साठी होति त्यावर या पंप वाल्यांनी एक्स्ट्रा प्रीमियम असा बोर्ड हटवला आणि तिथे साधे पेट्रोल सुरू केलें.
आपली नेमकी लूट कशी होते ते आपण पाहूया, आपण जेव्हा पेट्रोल भरायला जातो तेव्हा प्रत्येक मशीनवर दोन नोझल दिसते सकाळीं १२ वाजे पर्यंत डाव्या बाजूच्या नोझलने पेट्रोल भरले जाते जे पेट्रोल साधे आहे म्हणजेच आपण नियमित वापरतो ते ज्याची पर लिटर किँमत १०६/- रूपये आहे. दुपारी १२ नंतर त्याच मशिनच्या उजवी कडील नोझल ने पेट्रोल दीले जाते ते एक्स्ट्रा प्रीमियम आहे ज्याची पर लिटर किँमत ११३/- रूपये आहे. जवळपास ९९% ग्राहक हे लिटर प्रमाणे पेट्रोल घेत नाही सरसकट १००/- २००/- रूपये अस घेतात त्यामुळे आपल्या लक्षातच येत नाही की प्रति लिटर आपली सात रुपयांनी फसवणूक होत आहे.
महत्वाचा मुद्दा असा की एकाच मशीन ने दोन्हीं पेट्रोल कसे का टँकी वेगळी असायला पाहिजे कारण पेट्रोल वेगळे आहे ते कदाचित साधे पेट्रोल आपल्याला एक्स्ट्रा प्रीमियम म्हणून दिल्या जाते का अशी शंका येण्याला वाव आहे. या पेट्रोल पंपावर जर एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल आहे तर मग वेगळी मशीन ठेवायला काय हरकत आहे ज्याला एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल पाहिजे तो त्या मशीन वर गाडी लावेल आणि तिथून घेईल, किंवा दुपारी १२ नंतर एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल देतात तर तसे सांगीतले जाते का?
काही दिवस आधी माझ्या शेजारी राहणार माझा मित्र याने मला ही गोष्ट सांगितली गेल्या कित्तेक दिवसापासून मी या विषयावर माहिती घेण्याचं प्रयत्न केला आज मी स्वतः पंपावर गेलो असता मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला. एका लिटर मागें सरळ सरळ तुमची आमची सर्वांची सात रुपयाने फसवणूक होते आणि ते सुद्धा आपल्या डोळासमोर दिवसा ढवळ्या. आता ही गोष्ट शहराचे प्रशासकीय प्रमुख तहसीलदार यांना माहिती नसेल का ? मला जे दिसले ते मांडण्याचा मी प्रयत्न केला अशी माहिती सतिश रघाताटे यांनी सांगितली.
आता जनतेने स्वतःच या गोष्टीचा अनुभव घ्यावा आणि काय चूक काय बरोबर ते ठरवावं. मी सांगतो ते खर आहे अस मानण्याचा आग्रह नाही स्वतः आपणं अनुभव घेऊन ठरवा. दुपारी १२ते ४ या वेळेत किमान इथे ३०० लिटर पेट्रोल विकल्या जात असेल एक लिटर वर सात रूपये म्हंजे ३०० लिटर वर (३०० × 7 = 10500, एक दिवस 10500 × 30 = 315000 ) हा सर्व प्रकार नांदोरी चौक येथील मल्हारी पेट्रोल पंप इथली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

