संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:- येथून एक चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. 8 टन वजनाची लोखंडी जाळी घेऊन सोलापूरच्या दिशेने निघालेला कंटेनर चालक ठगबाज निघाला व त्याने एका व्यवसायिकाला सहा लाखांचा गंडा घातला. त्याने माल नियोजित ठिकाणी न पोहोचवता पोबर केला. ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अमित शिवशंकर अग्रवाल ३५ सूर्य नगर याचे श्याम इंटरप्राईजेस नावाचे दुकान असून ते लोखंडी जाड्या पुरवतात. त्यांना सोलापूर मधून आठ टन लोखंडी जाळ्याची ऑर्डर मिळाली होती. त्यांनी या दृष्टीने जय ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्स या कंपनीला कंटेनर पाठवण्यास सांगितलं एकूण सप्टेंबर रोजी ओडी 02 बीएफ 56 60 या क्रमांकाचा कंटेनर घेऊन राहुल विश्वकर्मा हा चालक आला. अमित यांच्या कर्मचाऱ्यांनी पावणे सहा लाखाचा माल ट्रक मध्ये लोड केला. तो माल 2 ऑक्टोबर पर्यंत सोलापूरला पोहोचवणे अपेक्षित होते. मात्र चालकांनें तीन ऑक्टोबर रोजी अग्रवाल यांना फोन करून सोलापूर जवळ कंटेनर नादुरस्त झाल्याचे कळविले. त्याने कंटेनर दुरुस्त झाल्याचे दुसरे दिवशी सांगितले व 24 हजार रुपये पाठवण्यास सांगितले.
यावेळी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाशी बोलून अग्रवाल यांनी त्यांला ऑनलाइन पैसे पाठविले. मात्र त्यानंतर राहुलचा फोन स्विच ऑफ येत होता. वारंवार प्रयत्न करून देखील त्याच्याशी संपर्क झाला नाही व सोलापूरला नियोजित ठिकाणी माल देखील पोचला नाही. तो माल घेऊन फरार झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे…

