✒️महेन्द्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर :- संगमनेर शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांतील आरोपींना संगमनेरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपाध्यक्ष राहुल मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत पोलिस उपाधीक्षक राहुल मदने म्हणाले, संगमनेर तालुक्यातील आनंदवाडील शांताराम पंढरीनाथ सरोदे यांची 6 हजार रुपयांची बॉक्सर दुचाकी चोरीस गेली होती.
पोलिस पथकाने ती हस्तगत केली. कोकणेवाडी शिवारात संजय कर्पे यांच्या मालकीचे 1 लाख 50 हजार रुपयांचे लोखंडी कंपाउंडच्या तारेचे 2 नग चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिस पथकाने अक्षय सुदाम मावस वय 22, वर्षे रा. खांडगाव, ता. संगमनेर व आकाश गणेश खरात वय 24 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, संगमनेर या दोघांना ताब्यात घेऊन चोरलेला मुद्देमाल व गुन्ह्यातील वाहन तपासकामी जप्त केले.
राजेंद्र गोकूळ माळवे रा.सिडको, नाशिक महामार्गाने जात असताना मागून दुचाकीवरून दोघांनी येऊन त्यांचा मोबाईल हिसकावून चोरला होता. याप्रकरणी सिद्धार्थ दीपक मावस व गणेश राजू गोफणे यांना पोलिसांनी मोबाईलसह ताब्यात घेतले. दोघांनी अकोले बायपास रोडने निघालेले आनंदा गोविंदनाथ भालाघरे रा. अभंगमळा, संगमनेर यांचा मोबाईल हिसकावला होता. तोही पोलिसांनी हस्तगत केला. विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, हा गुन्हा त्याचा भाऊ व गणेश राजू गोफणे रा. गोफने वस्ती, संगमनेर यांनी केला होता. त्यांच्याकडुन व्हिओ मोबाईल हस्तगत केला. डिग्रस येथील विघ्नेश धोंडिभाऊ मदने राजापूर येथील महाविद्यालयापासून जात असताना त्यांचा मोबाईल चोरीस गेला होता. तो विघ्नेश सूर्यवंशी व प्रमोद गवळी रा. अकोले नाका, संगमनेर यांच्याकडून पोलिसांनी ताब्यात घेतला.
