दर ५, १०मिनिटांनी वीज तड्यात, मड्यात,कमी दाबाचा पुरवठामुळे नागरिकांना होतोय त्रास.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- महावितरणकडून विद्युत ग्राहकांना चोविस तास वीज उपलब्ध व्हावी, अशी नागरिकांना अपेक्षा असते. परंतु अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत हाेत असल्याने वीज ग्राहकांचा मागील अनेक दिवसांपासून अपेक्षाभंग होत आहे. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली सुरू आहे.
काही दिवसात नवरात्राेत्सवही साजरा हाेणार आहे. या सण, उत्सवात विजेचा असा खेळखंडोबा सुरू राहिला, तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. हवा, पाऊस नसतांना सुद्धा कमी दाबाचा पुरवठा मुळे उकाड्याने हैराण झाले आहेत सतत वीज खंडित होत असलेल्या विज पुरवठा सुरळीत कधी होणार याची वाट नागरिकांनी पहावे लागत आहे.
अहेरी तालुक्यात वीज महावितरण कंपनीचा मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभाराचा फटका शालेय विध्यार्थी, व्यवसायीकांना तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे. सततचा खंडित वीज पुरवठा दर ५, १०मिनिटाला तड्यात, मड्यात होत असते. यापासून वीज महावितरण कधी सुटका करणार अशा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.
गेल्या काही महिन्यापासून राजाराम परिसरात अनेक भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. राजाराम परिसरात खांदला, पत्तीगांव, मरनेल्ली, कोतागुडम, चिरेपल्ली, रायगट्टा, गोल्लाकजी, निमलगुडम, गुड्डीगूडम इत्यादी गावे येत असून. या भागात नेहमीच वीज पुरवठा खंडित होत असून नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत. वीज एकदा गेली की, वीज यायला तासोन तास चातकपक्षां सारखी वाट बघावी लागत असते.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साप, विंचू निघण्याचे प्रमाण अधिक असते. व साप, विंचू चावून दगावन्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच शाळेतील विध्यार्थ्यांवर अभ्यासावर देखील भर पडत असतो. सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी वाट पाहणे नित्य नियमाचा खेळ झाला आहे.
वीज वितरण कंपनीच्या अभियंता यांना वारंवार फोन द्वारे सूचना देऊनही जाणून ते या कडे दुर्लक्ष करीत आहे. वीज बिलाची रक्कम विद्युत वितरण विभाग मात्र बिलाची रक्कम वेळोवेळी घेत असतात आणि रक्कम भरणा नाही केल्यास तातळीने वीज कापली जाते मात्र वीज पुरवठा सुरळीत केले जात नाही.
राजाराम परिसरातील लाईनमॅन मुख्यालयी राहत नसून नागेपल्ली ला राहत असून त्याच्या हाताखाली एक किव्हा दोन लोकांना ठेवत असून ते आपल्या मनमानी नुसार काम करत आहे. काही खाजगी लोक लाईनमॅन नसतांनासुद्धा खांबावर चढून विज दुरुस्ती करीत असतात. त्याच्या जीवीतास धोका झाल्यास किव्हा काही कमी जास्त झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशा खाजगी लोकांना कामावरून काढून कायमस्वरूपी लाईनमॅनची पदभरती करावी व राजाराम परिसरातील वीज वितरण कंपनीने लक्ष देऊन सुरळीत करावे अशी मागणी परिसतील नागरिकांनी पत्रकातून केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

