पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात छोटे मोठे व्यावसायीक कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जबदस्तीकरून, त्यांचेकडून हप्ता वसुली करुन, खंडणी गोळा करणाऱ्या इसमाबाबतची माहिती निर्भिडपणे देण्याकरीता पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकामार्फत दर्शनीय भागावर फ्लेक्स लावुन, नागरीकांना निर्भीडपणे तक्रार द्यावी याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने एका नॅशनल बँकेचे सिनिअर मॅनेजर यांना “तुझे रेकॉर्डींग व व्हॉट्सअॅप चॅट आहे असे सांगून अडीच लाख रुपये पाहीजेत नाहीतर तुला खोट्या गुन्हयात अडकवु, तुझी नोकरी घालवू व संपवुन टाकू अशी धमकी देवुन, २५ हजार रुपये खंडणी घेवुन आणखीन ०२ लाख रुपये खंडणी मागितली.” या मजकुराचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी मा. पोलीस आयुक्त यांना दिला होता. अर्जातील गांभीर्य ओळखुन, मा. पोलीस आयुक्तांनी खंडणी विरोधी पथकाचे वपोनि श्री अरविंद पवार यांना खात्री करुन, तात्काळ कारवाई करण्याचे सुचना दिल्या. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी अर्जदार बँक मॅनेजर यांचेकडे चौकशी करुन, नियोजीत सापळा लावुन, दिड लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या एका महिलेसह इसम नामे गणेश लक्ष्मण कोळी वय २७ वर्षे, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, प्लॉट नं. ११, हनुमान मंदीराचे बाजूस, शिवाजीनगर, पुणे यांना रंगेहाथ पकडुन, त्यांचे विरुध्द भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर ८२४ / २०२३ भादवि कलम ३८४,३८६,३८७, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन, आरोपी गणेश लक्ष्मण कोळी व महिला आरोपीस पुढील कारवाई कामी भोसरी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सहआयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. सतिश माने, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे याचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार किरण काटकर, विजय नलगे, आशिष बोटके, प्रदीप गुट्टे व मपोना संगिता जाधव (एएचटीयू) यांचे पथकाने केली आहे.