अक्षय म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
मो. न. 7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना जे गडकोट बांधले, जिंकून घेतले त्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यात अग्रेसर असलेली संस्था म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान. मात्र आपले कार्य फक्त दुर्ग संवर्धनापुरतेच मर्यादीत न ठेवता इतरही अनेक सामाजिक वाहून घेणाऱ्या ह्या प्रतिष्ठानमार्फत गेल्या काही वर्षांपासून सह्याद्री विद्यार्थी अकादमी अंतर्गत “बाप्पा माझा विद्येचा राजा” ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
ह्या संकल्पनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर अशा वस्तूंचे वाटप करण्यात येत असते. शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी रा. जि. प. प्राथमिक शाळा रावे येथील इ. पहिली ते चौथी च्या एकूण २३५ विद्यार्थ्यांना सह्याद्रीच्या दुर्गसेवकांकडून शाळोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी सर्व दुर्गसेवकांनी रावे गावची प्रसिद्ध देवता आई रायबादेवीचे दर्शन घेतले त्याप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याने प्रभावित झालेल्या रावे ग्रामस्थांच्या वतीने श्री राजा महादेव पाटील, श्री हिरामण पाटील आणि श्री संजय एकनाथ पाटील यांच्या हस्ते श्री समिर म्हात्रे यांचा मायेची ऊबदार शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष समिर सुभाष म्हात्रे, पेण विभाग उपाध्यक्ष स्वप्निल म्हात्रे (अच्युत कृष्णा पाटील – पेण विभाग प्रशासक, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान नोंदणीप्रमुख साईराज कदम, माजी अध्यक्ष केतन म्हात्रे, विशाल पाटील (सचिव), सागर म्हात्रे, शैलेश पाटील, आकाश म्हात्रे, शाहीद पाटील, अनिल देशमुख, चंदन महाराज, राहुल पाटील, निलेश बाळाराम पाटील इत्यादी दुर्गसेवक तसेच सामाजिक श्री कमलाकर पाटील, श्री बळीराम पाटील, अमित टावरी, गुरुनाथ पाटील, पत्रकार श्री. स्वप्निल पाटील आणि श्री राजेश कांबळे उपस्थित होते. तसेच सर्व दुर्गसेवक आणि मान्यवर उपस्थितांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरस्वती ठाकूर, श्री सुनिल पाटील आणि सर्व शिक्षकवृंदाकडून सह्याद्रीच्या सर्व क्षेत्रतील कार्याचा गौरव करून मनापासून आभार मानण्यात आले.