मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्या करीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समितीचा संघर्ष सुरूच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलनाचा काल १४७ वा दिवस शासकीय वैद्यकिय महविद्याला महिला कृती समितीने उत्साहाने साजरा केला.
मेडिकल कॉलेज करीता महिलांद्वारे ठरल्याप्रमाणे दर रविवारी अनोख्या पद्धतीने डॉ. आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात येते. ह्या रविवारी महिलांनी हाताला काळा कडदोडा बांधून १४७ वा कालचा आंदोलनाचा निषेध दिवस साजरा केला.
आता पर्यन्त वेगवेगळ्या पद्धतीने विविध घटकांनी शहरात शासकीय मेडिकल कॉलेज यावे ह्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. त्यामधे प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते (प्रदेशाध्यक्ष) जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिरभाऊ कुणावर ह्यांनी विधान सभेत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे. ह्या संबंधी प्रश्नावर प्रतिउत्तरात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेजचे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याचे संगितले होते. आता ती बाब त्याच मुद्द्यावर येऊन ठेपले आहे.
त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ ह्यांची भेट आणि त्यांचे कॅबिनेट बैठकीत बसून मागणी मान्य करून घेण्याचे आश्वासन अशा इतर वेगवेगळ्या घटना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये होण्यास अनुकूलच घडल्या. अशा रीतीने कॉलेज हिंगणघाट येथे येण्यासाठी विविध प्रयत्न आताही सुरूच आहेत. त्यामधे श्याम इडपवार ह्यांचे अन्नत्याग सत्याग्रह उपजिल्हाधिकारी ह्यांच्या आश्वासन मिळाल्यावर मागे घेण्यात आले होते.
महिला कृती समितीच्या आंदोलकांनी आंदोलन सतत तसेच पुढे रेटायचे ठरवले आहे. त्याप्रमाणे त्यानुसार काल १४७ व्यां दिवशी महिलांनी हातात काळा कडदोडा बांधून प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीं ह्यांचा निषेध केला. वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास सर्व सुनियोजित कृती करण्यास पाठपुरावा सरकार आणि प्रतिनिधी ह्यांनी करावा अन्यथा आंदोलन असे चालूच राहील असा इशारा शासकीय वैद्यकीय महविद्यालय महीला कृती समिती च्या वातीनी देण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने सावित्रीच्या लेकी या सामाजिक संस्थेच्या सीमा मेश्राम, राजश्री बांबोळे, रूपा सोरदे, मोनाली फुलझेले, निर्मला भोंगाडे, सुषमा पाटील, वैशाली वासेकर, संध्या जगताप, लीना नगराळे, भाग्यश्री नगराळे, प्रीती चव्हाण, पूजा वानखेडे, तन्मय वासेकर, नंदिनी मांडवे, सुजाता रामटेके, कोयल धवणे, प्रिन्सी धवणे, श्रिष्टी रामटेके इ. उपस्थीत होत्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

