मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन गडचिरोली दि. २३ ऑक्टोंबर:- रेड़्डी गोडाऊन येथे दरवर्षी दुर्गा मातेची स्थापना करून नवरात्री महोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्ताने खासदार अशोकजी नेते यांनी रेड़्डी गोडाऊन येथील दुर्गा मातेची विधिवत पुजा अर्चना आरती करून मंडळाला भेट दिली.
त्यावेळी किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, सामाजिक नेते प्रकाश निकुरे, शेखरभाऊ साळवे, मनिष भुसकुळे, राजुभाऊ मल्लेलवार, नितिन चिडयालवार, कार्यकर्ते गण, नागरिक, महिला वर्ग उपस्थित होते. तसेच याप्रसंगी खासदार महोदयांनी दुर्गा मंडळाच्या पदाधिकारी व स्थानिक गडचिरोली वासियांना नवरात्री महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

