कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते डॉ, धम्मसेवक महाथेरो यांच्या हस्ते कार्यक्रम पार
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील देसाईगंज येथे दि.२८ ऑक्टोंबर ला दीक्षाभूमी देसाईगंज येथे अश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास समाप्तीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन परित्रानपाठ चे आयोजन सम्यक जागृत बौध्द महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे करण्यात आले होते.
या परित्रानच्या कार्यक्रमात पुज्य भंते डॉ. धम्मसेवक महाथेरो व भंते नंद यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सर्व बौध्द उपासक, उपसिका यांच्या करिता हा दिवस अत्यंत मंगलमय आहे. कारण अश्विन पौर्णिमेला वर्षवास समाप्ती होत असते व संपूर्ण भिक्खू संघ गोड खीर प्राशन करून वेगवेगळ्या दिशेने बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला बाहेर पडतात.कार्यक्रमा ला परिसरातील असंख्य उपासक ,उपसिकांची उपस्थिती होती. त्याबद्दल सम्यक जागृत बौध्द महिला समिती मोठया संख्येने उपस्थित होते.

