मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराचा प्रारंभ केला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचा भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायत मडवेली अंतर्गत येत असलेल्या गावा गावामध्ये जंगी स्वागत, यावेळी अजय भाऊ यांनी गावकऱ्यांशी विविध समस्यांवर संवाद साधला.
यावेळी आदिवासी विदयार्थी संघटनाचे तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा, युवा कार्यकर्ते लक्ष्मीकांत बोगामी, सल्लागार लालसू आत्राम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, नरेंद्र गर्गम, प्रभाकर मडावी, चिनू सडमेक, येचलीचे सरपंच कमलताई कुरसम, उपसरपंच संजय येजुलवार, भामरागड तालुक्यातील आवीस व अजयभाऊ मिञ परिवाराचे समस्त कार्यकर्ते पदाधिकारी गावातली नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

