पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे,दि.०५ सप्टेंबर:- गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गणेश उत्सव अनुषंगाने कोथरूड पोलीस ठाणे हददीत रेकॉर्डवरील गुन्हेगार व मंडळांना भेट देत पेट्रोलिंग फिरत असताना बातमी प्राप्त झाली की, दिनांक ०४.०९.२०२२ रोजी झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर इसम नामे श्रीपाद यादव रा. आकुर्डी, पुणे याने डिगोरा बजवळ थांबून मोबाईलवरून सट्टा खेळून जिंकलेले पैसे घेण्यासाठी येवून थांबलेला आहे.
अशी बातमी प्राप्त झाल्याने वरिष्ठांच्या आदेशाने डिमोरा पबजवळ सापळा लावून इसम नामे श्रीपाद मोहन यादव वय २४ वर्षे रा. सुंदर आनंदी निवास, पांढरकर वस्ती गणेश मंदीरामागे, आकुर्डी, पुणे याला ताब्यात घेवून त्याचेकडील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करता त्याने बुकी ( पाहिजे आरोपी ) याचेकडे दि. ०४/०९/२०२२ रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेट मॅचवर सट्टा लावल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या ताब्यातून सट्टा लावण्यासाठी वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून मुळ बुकीचा शोध घेत आहोत.
सदर बाबत बंडगार्डन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून श्रीपाद मोहन यादव वय २४ वर्षे रा. सुंदर आनंदी निवास, पांढरकर वस्ती, गणेश मंदीरामागे, आकुर्डी, पुणे याला अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. श्रीनिवास घाडगे, मा.सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनिता मोरे, युनिट-३ चे पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, प्रकाश कटटे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, गणेश शिंदे. साईनाथ पाटील, सतिश कत्रांळे, प्रताप पडवाळ, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढिल तपास अजितकुमार पाटील पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे शहर हे करीत आहेत.