अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना त्यांच्या इतर वैद्यकीय तपासणी करीता जसे की, ईसीजी, सिटिस्कॅन, एमआरआय, 2 डी इको, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, मूत्रविज्ञान न्यूरोसर्जरी व इतर आवश्यक असलेल्या तपासणी करीता शासकीय सर्वोपचार रुग्णालयातुन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मध्ये पाठवले जाते.
यावेळी बाहेर गावातील आलेल्या गोरगरीब रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पायी किंवा ऑटो द्वारा जाणे येणे करावे लागते. याचा गोरगरीब रुग्णांना नाहक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध असलेली एक रुग्णवाहिका या रुग्णांना तपासणी करीता सर्वोपचार रुग्णालयातुन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ने – आण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा तिव्र आंदोलन छेडु अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांनी तात्काळ रुग्णांसाठी एक रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध करून दिली.
सर्वोपचार रुग्णालय ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करीता रुग्णवाहिका सुरू केल्याचे सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांना डॉ मिनाक्षी गजभिये यांनी फोनद्वारे सांगितले.सर्वोपचार रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासणी साठी जाणाऱ्या रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज असल्यास रुग्णं किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी शासकीय सर्वोपचार रुग्णालय कीवां शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता यांच्या कार्यालयात संपर्क साधला असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या अधिष्ठता डॉ. मिनाक्षी गजभिये तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी केले आहे. यावेळी समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडुदादा वानखडे, वंचित बहुजन आघाडी चे युवा कार्यकर्ता सुमित भाऊ तेलगोटे,सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे, पत्रकार समिर खान, सईद खान उपस्थित होते.