मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा-आसरअल्ली नॅशनल हायवे क्रमांक ६३ महामार्गाचे बांधकाम सुरू होऊन ४ ते ५ वर्षे पूर्ण होत आहे, सिरोंचा ते वडदाम गावाजवळ पर्यत रस्त्याचे कामे झाल्याचे दिसून येत आहे. या महामार्गाचे कामे प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर या कंपनी यांच्या तर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
सिरोंचा – आसरअल्ली गावापर्यंत सुरू असलेल्या महामार्गाचे बांधकाम वडदाम गावापर्यंत झाल्याने पुढे आसरअल्ली गावापर्यंत कामे अपूर्ण आहे आहे. या अर्धवट महामार्गाचे कामामुळे तालुक्यातील सिरोंचा मुख्यालयात येण्या – जाण्या करणाऱ्यांना महामार्गावरील असलेल्या खड्ड्यात पडून अनेक अपघात होत आहे. महामार्गावर टर्निंग येथे आवश्यक तिथे गतिरोधक (सूचना फलक) रेडियम स्टिकर नसून आज पर्यंत 8 गरिबांचे मृत्यू देखील झाली आहे.
सिरोंचा – आसरअल्ली महामार्गावर आरडा – राजन्नपल्ली येथे (गतिरोधक) नसून लक्ष्मीदेवपेठा गावाचे 5 लोकांची आणि चिंतारेवुला गावाचे 1 युवक आणि आरडा गावाचे 1 इसम, राजन्नपल्ली गावाचे 1 इसम आणि 25 पेक्षा जास्त लोकांची गंभीर जखमी झाली आहे.
प्रशासन आणि प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर कंपनीच्या हलगर्जी कामामुळे आज अनेक नागरिकांचे जीव जात आहे. त्यामुळे महामार्गाचे अर्धवट कामामुळे आणि आमच्या मागणीची दुर्लक्षमुळे होत असलेल्या अपघाताचे ठेकेदारांवर मनुष्यवादाचे गुन्हा दाखल करून त्यांना काला यादीत टाकण्यात यावे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्हा दाखल करून त्यांना कार्यकारी अभियंता पदावरून निलंबित करण्यात यावे.
आज पर्यंत महामार्गावर झालेल्या आणि होणाऱ्या अपघाताचे महामार्गाचे कामे करणाऱ्या ठेकेदारांवर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपये, तसेच मृतक कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्यात यावे. अन्यथा बाधित कुटुंबियांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशारा सामाजिक कार्यकर्ता – रा,काँ,प,ता,उ, – सागर मूलकला यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.