हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बामनवाडा:- येथे 15 नोव्हेंबर 2023 रोज बुधवार ला बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रम तीन टप्प्यात घेण्यात आले, ज्यामध्ये रॅली,जनसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात रॅली चे उद्घाटन मा दिलीप मडावी (उपाध्यक्ष, बिरसा क्रांती दल, बामनवाडा) यांच्या हस्ते झाले. रॅली मध्ये संपूर्ण बामनवाडा रहवासी यांनी सहभाग घेतला. रॅली चे विशेष आकर्षण म्हणजे पळसगाव येथील खुशी मडावी आदिवासी पारंपरिक नृत्य संच होता. रॅलीत पारंपरिक नृत्य करत समस्त जनतेच लक्ष वेधून घेतले.
या जनसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. भारती जगदीश पाल सरपंच, ग्रामपंचायत बामनवाडा हे असून, त्यांनी जनतेला संबोधित करताना आयोजक यांचे आभार मानले व असे आदिवासी जनसंवाद कार्यक्रम होणे व आदिवासींना, आदिवासी समाजसुधारक यांचे कार्य माहिती करून घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी धर्मुजी नगराळे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, राजुरा यांनी सुद्धा बिरसा मुंडा यांच्या संघर्षाची थोर पुरुष महामानवाचे विचार व प्रचार प्रसार यांचे वाचन करावे तसेच बिरसा मुंडा उत्सव समिती बामणवाडा चे अभिनंदन करून आभार करून माहिती जनतेला दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ मडावी संस्थापक, अध्यक्ष, बिरसा क्रांती दल होते. त्यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली व भूतकाळात आदिवासी वर झालेले अत्याचार, वर्तमान काळात होत असलेले अत्याचार तथा भविष्यात होऊ शकणारे अत्याचार या बाबत चिंता व्यक्त केली. आणि भविष्यात आदिवासींनी सावध राहण्याचे तथा आपले हक्क जाणून घेत, ते संविधान च्या मार्गाने मिळविण्याचा इशारा दिला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, अविनाश टेकाम उपसरपंच, ग्राम. पं. बामनवाडा, मिश्रा सचिव. ग्राम. पं. बामनवाडा, सर्वानंद वाघमारे सदस्य, ग्राम. पं. बामनवाडा यांनी जनतेला संबोधताना बिरसा मुंडा यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. प्रफुल चौधरी सदस्य,ग्राम. पं. बामनवाडा, सौ. भारती पंकज करमनकर सदस्य, ग्राम. पं. बामनवाडा, श्रीमती. सुजाता मेश्राम सदस्य, ग्राम. पं. बामनवाडा, सौ. मंजुषा राजू कोडपे सदस्य, ग्राम. पं. बामनवाडा, सौ. समिश्रा प्रणित झाडे सदस्य, ग्राम. पं. बामनवाडा, राकेश वाघमारे सदस्य,ग्राम. पं. बामनवाडा, आनंद नगराळे. पोलिस पाटील, बाबुराव जीवने अध्यक्ष, तंटा मुक्ती समिती, प्रवीण टेकाम अध्यक्ष, बिरसा क्रांती दल, गाव शाखा बामनवाडा यांनी बिरसा मुंडा यांचा इंग्रजांविरुद्धचा संघर्ष लोकांना समजविला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक धीरज मेश्राम कार्याध्यक्ष,ऑफ्रोट राजुरा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर कोटणाके अध्यक्ष, ऑफ्रोट, राजुरा यांनी आदिवासी संस्कृतीचे इतिहास, आदिवासी संस्कृतीचे महत्त्व सर्वांना पटवून दिले, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. बंडू मडावी सचिव, ऑफ्रोट, राजुरा, डॉ. प्रवीण येरमे, डॉ. शारदा येरमे,
घनश्याम मेश्राम उपाध्यक्ष, श्रमिक एल्गार, संतोष कुडमेथे विदर्भ प्रमुख, आदिवासी टायगर सेना, असे पाहुणे मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष परचाके युवा जिल्हाध्यक्ष, बिरसा क्रांती दल व साहिल कोडापे सचिव, बिरसा क्रांती दल, गाव शाखा बामनवाडा यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अभिलाष परचाके, उपाध्यक्ष गुरुदास घोडाम, सचिव नागेश टेकाम, सदस्य साहिल कोडापे, मयूर कोडापे, राकेश कोडापे, जालिंधर टेकाम, दिलीप मडावी, संदीप कोडापे, रुपेश घोडाम, शैलेश अत्राम, प्रशांत टेकाम, परमेश्र्वर कोडापे, प्रवीण टेकाम, दशरथ कोडापे, दामोदर टेकाम, बंडू कोडापे, गंगाधर टेकाम, विजय टेकाम, रामदास टेकाम, घनश्याम कोडापे, धनराज टेकाम व समस्थ बामनवाडा गावकरी बंधू / भगिनी यांनी सहाय्यता केली.
यावेळी गावातील समस्थ महिला/पुरुष यांनी मिळून सल्ला – गांगरा यांची पारंपरिक रीतीने पूजा केली आणि रॅली ला सुरुवात झाली. रॅली चे समारोपंन बामनवाडा येथील माऊली येथील भव्य पटांगण येथे झाले. जनसंवाद कार्यक्रम नंतर लगेच भोजनाला सुरुवात झाली. १५०० पेक्षा जास्त लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला आणि समस्थ जनतेनी कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य केले. बामनवाडा येथील समस्थ ग्रामपंचायत सदस्य व जनतेने पूर्णपणे कार्यक्रमाला सहकार्य केलं, या कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि अशेच जनजागृतीचे कार्यक्रम नेहमी घेण्यात यावे असे आशीर्वाद दिला.
यावेळी साहिल कोडापे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ मडावी संस्थापक, अध्यक्ष, बिरसा क्रांती दल, उद्घाटक सौ. भारती जगदीश पाल सरपंच, ग्राम पंचायत बामनवाडा, डॉ.मधुकर कोटनाके, दिलीप मडावी, सर्व प्रमुख पाहुण्यांचे व समस्थ जनतेचे आभार मानत कार्यक्रम संपविण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348