मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- दि.14 नोव्हेंबर 2023 रोजी पोलिस स्टेशन जिमलगट्टा येथे गडचिरोली पोलीस दल,पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान), अनुज तारे, कुमार चिंता (प्रशासन) व अप्पर पोलीस अधिक्षक (अहेरी) यतीश देशमुख यांचे संकल्पनेतून व सुजितकुमार क्षिरसागर सा. उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा यांचे मार्गदर्शनाखाली भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा व विर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन सुजितकुमार क्षिरसागर, पीआय केंद्रे एसआरपीएफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेची सुरुवात वीर बाबूराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला पुष्पहार व फित्त कापून करण्यात आले. यावेळी प्रभारी अधिकारी बिरादार यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व जास्तीत जास्त लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉल स्पर्धा व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे नियोजन पो उपनिरीक्षक गव्हाणे मॅडम व जिल्हा पोलिस अंमलदार व एसआरपीएफ चे अधिकारी व अंमलदार यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.
सदर कार्यक्रमात उपपोस्टे जिमलगट्टा हद्दीतील 12 व्हॉलिबॉल 8 कबड्डी संघ सहभाग घेतला होता यावेळी उपस्थित सर्व खेळाडूंना अल्पोपहारची व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.
दिनांक 15 नोव्हेंबर रोजी उपपोस्टे जिमलगट्टा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त यंदाची दिवाळी आदिवासी बांधवासोबत या भव्य जनजागरण मेळावा व भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉल स्पर्धा व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. व विजेते संघाना पुढील प्रमाणे बक्षीस देण्यात आले.
कबड्डी स्पर्धा: १) प्रथम क्रमांक पारितोषिक विजेता संघ – अर्कापल्ली- रोख 3000 रुपये २ ) द्वितीय क्रमांक पारितोषिक विजेता संघ – किष्टापुर- रोख 2000 रुपये ३) तृतीय क्रमांक पारितोषिक विजेता संघ – रसपल्ली – रोख 1000 रुपये
व्हॉलीबॉल स्पर्धा: १) प्रथम क्रमांक पारितोषिक विजेता संघ – जिमलगट्टा -रोख 3000/ रुपये व व्हॉलीबॉल व नेट २ ) द्वितीय क्रमांक पारितोषिक विजेता संघ मेडपल्ली -रोख 2000/ रुपये व व्हॉलीबॉल व नेट ३) तृतीय क्रमांक पारितोषिक विजेता संघ – अर्कापल्ली -रोख 1000 / रुपये व व्हॉलिबॉल व नेट
यावेळी सर्व सहभागी संघांना नेट व व्हॉलीबॉल देण्यात आले. तसेच जनजागरण मेळावा करिता अतिदुर्गम भागातील मौजा पत्तीगाव येथील 170-200 नागरिक उपस्थित होते. त्यांना खालील प्रमाणे साहित्य वाटप करण्यात आले. १) साड्या- 120 नग २) पुरुषाचे ड्रेस – 50 नग ३) साखर, तेल, रवा, मैदा, साबण असे एकत्रित करून -100 पॅकेट देण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना तसेच स्पर्धकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी जिमलगट्टा परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.