पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- गणेशोत्सवामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन गाडे व अभिजीत जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फेत बातमी मिळाली की भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७०७/२०२१ भादंवि कलम ३०७, ५०७, ३४ या गुन्हया मध्ये फरार असलेला व सध्या तडीपार असलेला आरोपी तनिष्क संतोष सोनवणे, वय-२० वर्षे, रा. सन ६७ / २, बालाजी संकुल, लेन नं.६, सच्चाई माता मंदीर, आंबेगाव खुर्द, पुणे हा सच्चाई माता मोरया गॅरेज जवळ थांबला आहे.
सदर बातमीचे अनुशंगाने तपास पथकाचे अधिकारी पो.उप निरी. धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार यांनी नमुद ठिकाणी जावुन आरोपीताचा शोध घेतला असता तो मिळुन आला. त्याचेवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तडीपार आदेशाचा भंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीवर दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. श्री.सागर पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, मा. श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील श्री. जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती संगीता यादव, श्री विजय पुराणिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, सचिन गाडे, तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने केली आहे.

