पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- फिर्यादी यांच्या पत्नी हया पुणे महानगरपालिका मध्ये नगरसेविका म्हणून सन २०१७ मध्ये निवडून आलेल्या आहेत. नमुद आरोपी नामे-जितेंद्र अशोक भोसले, रा. विमाननगर, पुणे हा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचेवर यापुर्वी खंडणीचे ०३ गुन्हे व इतर ०३ गुन्हे दाखल आहेत. तो माहीती अधिकार कार्यकर्ते म्हणुन काम करत असुन त्याने फिर्यादी व त्यांची पत्नी यांचे विरुद्ध बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नगरसेवक पद रदद् करण्याकरीता सन २०१८-१९ पासुन वेग-वेगळया शासकिय कार्यालयात खोटे अर्ज दाखल केले. होते.
सदरचे अर्ज मागे घेण्यासाठी तसेच येणा-या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सोशल मिडीयांचे माध्यमातुन फिर्यादी यांची पत मलीन करण्याची भिती घालून फिर्यादी यांचेकडे २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करून सदर रक्कम न दिल्यास जीवे ठार मारण्याची व अॅट्रासिटीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची धमकी देत असल्याने आरोपीवर कायदेशीर कारवाई करणेबाबत फिर्यादी यांनी तक्रारी अर्ज दिला होता.
सदर अर्जाच्या अनुषंगाने फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे केलेल्या चौकशीअंती पाहिजे असलेला आरोपी जितेंद्र अशोक भोसले हा फिर्यादी यांचेकडे २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन, सदर रक्कम न दिल्यास अॅट्रासिटीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची धमकी देत असल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी जितेंद्र अशोक भोसले याचेविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नं. ३३७ / २०२२ भा.दं.वि. कलम ३८५.३८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २. श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहा. पो. निरी चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक, मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे, अमोल पिलाणे, सचिन अहिवळे, सदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, पवन भोसले, रवि सपकाळ, महीला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णेवर यांनी केलेली आहे.