पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ व ३ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :-आज दि. १९/११/२०२३ रोजी सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ५६४/२०२३ भादंविक ३०२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ या गुन्हयाचा मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री सुनील तांबे, गुन्हे १. पुणे शहर यांचे आदेशान्वये गुन्हे शाखा, युनिट २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई व गुन्हे शाखा, युनिट ३ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना समांतर तपास करणेबाबत आदेशित केल्याने मा. वरिष्ठांचे आदेशाने सपोनि वैशाली भोसले युनिट २. पोलीस हवालदार २४६ उत्तम तारू, युनिट २. पोलीस हवालदार २३१८ शरद वाकसे युनिट 3 , यांना मिळालेल्या बातमीवरून व पोलीस हवालदार ७०२५ संजीव कळंबे युनिट ३ यानी केलेल्या तांत्रिक विश्लेषण वरून सयुक्त तपास करीत असताना मयत इसमाचे मिळालेले मोबाईल क्रमांक वरून सीडीआर प्राप्त करून त्याचे विश्लेषणाव्दारे मिळालेला संशयीत मोबाईल क्रमांक वरून शोध घेत असताना सदर मोबाईल धारक इसम हा धनगरवस्ती, न-हे, पुणे येथे असल्याची माहिती मिळालेवरून त्याचा न-हे भागात शोध घेतला असता तो धनगर वस्ती धायरी येथे २०.१० वा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिकेत मुकुंद परदेशी, वय २८ वर्षे, रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी, न-हे, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता मयत नामे सौरभ शिंदे याने आरोपीचे बायकोला घाण घाण बोलून आरोपीस गे आहेस असे बोलला होता त्याचा राग मनात धरून आरोपीने मयता चे डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगून दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यास ताब्यात घेतलेबाबत त्याची पत्नी नामे स्नेहल अनिकेत परदेशी वय २८ वर्षे रा. सदर यांना समक्ष कळविण्यात आले असून त्यास सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ५६४/२०२३ भादंविक ३०२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ या गुन्हयाचे पुढिल तपासकामी सिहंगड पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री. सुनील तांबे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई युनिट 2 ,पो नि श्रीहरी बहीराट युनिट 3 यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि वैशाली भोसले, पो हवा उत्तम तारू , शरद वाकसे, संजय जाधव, संजीव कळंब या पथकाने केलेली आहे