पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे याचे आदेशाने हद्दीमधील पोलीस रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम, घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी खाजगी वाहनावरुन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहा. पो. फौजदार आबा उत्तेकर पोलीस अंमलदार राहुल ओलेकर व पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे मन्या चोरघे व त्याचे सोबत त्याचा मित्र वैभव तरडे यांचे कडे गावठी पिस्टल असुन ते दोघे आता नांदेडसिटी गेटच्या बाजुस सार्वजनिक रोडच्या कडेला सिंहगड रोड पुणे येथे थांबले आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सोबतचे सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीचा मजकुर मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक, गुन्हे, सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार लागलीच सदर बातमीच्या ठिकाणी जावुन सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम यांनी सापळा लावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे मन्या चोरघे व वैभव तरडे हे त्याठिकाणी थांबले असल्याचे दिसले. त्याची व आमची नजरा नजर होताच ते दोघेही त्या ठिकाणावरुन नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना सोबतचे स्टाफच्या मदतीने काही अंतरावर दि.२०/११/२०२३ रोजी १७/२० वा. सुमारास त्यांना शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव पत्ता (१) मनोज ऊर्फ मन्या ऊर्फ शिवप्रसाद किसन चोरघे वय-२० वर्षे रा. पोकळे कॉम्पलेक्स प्लॅट नं १०३ पोकळे वरती धायरेश्वर मंदीरामागे धायरी पुणे (२) वैभव अनंता तरडे वय-२३ वर्षे रा. प्लॅट नं १०१ स्वयंभु रेसिडेन्सी धायरेश्वर मंदीरामागे धायरी पुणे असे असल्याचे सांगितले त्यांना अधिक विश्वासात घेवुन तपास करता, त्याचे जवळ ७५,०००/-रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल व १५००/-रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुसे असा एकुण ७६,५००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन अटक आरोपी क्र.१ यांचेविरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत. १) सिंहगडरोड पो स्टे गु र नं. १) १९७/२०२१ भा.द.वि.क. ३०२,३०७, १४३,१४७,१४८,१४९, आर्म अॅ.क. ४
(२५) म.पो.का. क. ३७ (१) सह १३५ अन्वये २)११०/२०२२ भादवि ३०७,१४३,१४४,१४५,१४७,१४८,१४९ आर्म अधि.क. ४(२५), म.पो.का.क.३७(१) सह १३५ २) आरोपी क्रमांक २ यांचेविरुध्द याचे विरुध्द सिंहगडरोड पो स्टे गु र नं. १) १९७/२०२१ भा.द.वि.क. ३०२ ३०७,१४३,१४७,१४८,१४९, आर्म अॅ.क. ४ (२५) म.पो.का. क. ३७ (१) सह १३५
दाखल गुन्हयाचा पुढील अधिक तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सचिन निकम सहा. पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. सुहेल शर्मा सो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३, श्री आप्पासाहेब शेवाळे सोा, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री. अभय महाजन सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, सहा.पो. फौज, आबा उत्तेकर पोलीस अंमलदार, संजय शिंदे, राजु वेंगरे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडोळे, अमोल पाटील, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, विकास बांदल, अविनाश कोंडे, यांचे पथकाने केली.

