मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्यातील एटापल्ली तालुक्यातील टीटोळा गावचे पाटील लालसु वेळदा वय 60 वर्ष यांची नक्षल्यांनी हत्या करून गावातील दहा ते बारा नागरिकांचे अपहरण केल्याने एटापल्ली तालुक्यात दहशत परसली आहे.
ता.२३ गुरुवार रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दोनशे पेक्षा जास्त संख्येने टीटोळा गावात आलेल्या नक्षल्यांनी गावाला घेराव घालून पाटील लालसू वेळदा यांची दगडाने ठेचून हत्या केली व दहा ते बारा गावकरी नागरिकांचे अपहरण करण्यात आले, सदरची घटना वादग्रस्त सुरजागड लोहखनिज उत्खनन कामात लालसू वेळदासह इतर गावकरी मदत करीत असल्याचा संशयातून नक्षल्यांनी लालसू वेळदा यांची हत्या करून नागरिकांचे अपहरण केल्याचे बोलल्या जात आहे, घटनेची तक्रार हेडरी पोलिसांनी करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना समोर येताच परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.