महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ओडिशा :- राज्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील गंजम जिल्ह्यात एका नराधम पतीने आपल्याच पत्नी आणि मुलीच्या बेडरुममध्ये कोब्रा हा विषारी सर्प सोडून त्यांची निर्घृण हत्या केली. ही घटना समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नराधम आरोपी पतीला बेड्या ठोकल्या असून गणेश पात्रा असं आरोपी पतीचं नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी गणेश पात्रा याचे आपल्या पत्नी बरोबर मागील काही दिवसांपासून कुटुंबिय वाद सुरू होते. या वादातूनच आरोपी गणेश पात्रा त्याने आपल्याच पत्नी आणि दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या हत्येचा कट आखला होता आणि हे हत्याकांड घडवले.
आरोपी पती गणेश पात्रा यांने आपल्या ओळखीच्या एका सर्पमित्र असलेल्या व्यक्ती करून विषारी असलेला कोब्रा हा साप मिळवला होता. 7 ऑक्टोबरला त्याने पत्नी आणि 2 वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या खोलीत कोब्रा हा साप सोडला. कोब्रा या सापाने माय – लेकीला दंश केला होता. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी तपासणी केल्या नंतर त्यांना मृत घोषित केलं.
अशी आली घटना समोर…
सापाने दंश केल्याने आई व मुलीचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचं वाटलं होतं. पण जेव्हा मृतक महीलेलच्या वडीलेने पोलीस स्टेशन येथे आपल्याच जावया विरुद्ध तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांना तपास सुरु केला आणि ही धक्कादायक घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांनी सखोल तपासा करत गणेश पात्राने एका सर्पमित्रा कडून कोब्रा घेतल्याची माहिती मिळाली. यानंतर पुढील गोष्टी उलगडल्या आणि आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस आरोपी पतीच्या सर्पमित्राचाही चौकशी करणार आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी बोलताना सांगितले की त्या रात्री या कुटुंबीयांनी सापाला ठेचून मारलं होतं आणि दोघींना रुग्णालयात दाखल केलं होतं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं. पण आरोपीच्या सासऱ्यानी केलेल्या आरोपांच्या आधारे आम्ही तपास सुरु केला होता. तपासादरम्यान आम्हाला पती गणेश पात्रा याने एका सर्पमित्राकडून कोब्रा घेतल्याची माहिती मिळाली. त्या सर्पमित्राचीही चौकशी केली जाणार आहे”. पोलिसांनी आरोपी पती गणेश पात्रा याला बेड्या ठोकल्या असून पुरावे गोळा करून पुढील तपास सुरु आहे.