महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :– टिळेकर नगर येथील रहिवाशी अभिजित माने यांची आई कौशल्या माने यांचे 23तारखेला सकाळी 11वाजता निधन झाले. अभिजित माने हे रिक्षाचालक आहेत घरची परिस्थिती हलाकीची आहे. उपचारादरम्यान पुणे मनपा कडून आलेली जवळपास एक लाख रु व अभिजित माने कर्ज काढून 25हजार रु असे एकूण हॉस्पिटल मध्ये एक लाख 25 हजार रु भरलेले असताना देखील ज्या वेळी कौशल्या माने यांचे प्रेत अजून 60 हजार भरा नाही तर प्रेत देता येणार नाही असे बोलून नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना जवळपास 6तास रखडवले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे हडपसर मतदार संघांचे उपाध्यक्ष सुरेश उर्फ बाळा कवडे हे गेले असता त्यांनी बिलिंग विभागाच्या सत्रे साहेबाना खुप वेळा विनंती करून देखील या अधिकाऱ्याला घाम फुटला नाही शेवटी सर्व राष्ट्रवादी चे सुरेश उर्फ बाळा कवडे आणि सर्व कार्यकर्ते संतापले व लोकशाही मार्गाने आंदोलन केले तेंव्हा तेथील बिल माफ करण्यासाठी जेवढे नागरिक आले होते त्यांचे सर्वांचे बिल माफ करण्यात आले अशी माहिती मिळाली…