मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- जिल्हातून येथून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे विवाहित दांपत्याने खळबळजनक पाऊल उचलले एका पती व पत्नीने एकाच रूममध्ये आत्महत्या केल्याची घटना चांदवडच्या परसूल येथे घडली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. पत्नीने विष घेऊन तर पतीने घळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊसाहेब बरकले असे पतीचे तर सुनीता बरकले असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या दाम्पत्याला एक मुलगी असून भाऊसाहेब बरकले यांची आई तसेच त्यांची मुलगी या दोन्ही एका वेगळ्या रूममध्ये होत्या. तर हे पती – पत्नी हे दुसऱ्या रूममध्ये झोपले होते. सकाळी भरपूर वेळ होऊनही रूमचा दरवाजा नउघडल्याने आई ने रूममध्ये आवाज दिला पण आत मधून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील नागरिक गोळा झाले त्यानंतर दार तोडून बघितले असता ही घटना समोर आली. यानंतर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांचा ताप्या दाखल झाला. दोघाचे मृत्युदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. घरगुती वादातून या दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348 / 9766445348