उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रवस्थी विहार संजय नगर सांगली च्या वतीने कार्तिक पौर्णिमा आणि संविधान दिंन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील माजी न्यायाधीश प्रमोद आंकुश भोकरे यांची उपस्थित होती.
यावेळी त्यांनी भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकासाठी ज्या प्रमुख तरतुदी दिल्या आहे त्या विषेद केल्या. सांगली मिरज आणि कुपवाड शहराचे माजी उपयुक्त चंद्रकांत चौधरी यांनी कार्तिक पौर्णिमा निमित्त भगवान बुद्धाच्या काळातील घटना क्रम सविस्तर सांगितला.
यावेळी भारताचे संविधान प्रास्ताविका अवंतिका वाघमारे यांनी वाचन केले. यावेळी संस्थेचे खजिनदार माने सर यांनी प्रास्ताविक आणि संविधानाचे महत्व सांगितले यावेळी पी एम कांबळे यांनी भोकरे सरांचा सत्कार केला संस्थेचे अध्यक्ष कोलप सर यांनी ॲड. गोंधळे सरांचा सत्कार केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषण व सर्वांचे आभार मानले. संविधान इतक सोप्पं नाही की एका तासात बदलता येईल ते भाषणात म्हणाले त्या नंतर दिनांक 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या आतंकवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहिली आणि कार्यक्रम संपला झाला.