पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- हडपसर पोलीस ठाणे हद्दीत पाठीमागील काही दिवसांमध्ये दिवसा घरफोडी होणारे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांची टिम तयार करून घरफोडी झालेल्या ठिकाणांची माहीती संकलीत केली.त्यानुसार तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अविनाश शिंदे पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड असे पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना, एक संशयीत विधीसंघर्षित बालक पाण्याची मोटार घेवून जाताना दिसला. त्यास थांबवून त्याचेकडे चौकशी करीत असताना तो वेगवेगळी माहीती देत असल्याने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने घरफोडीचे गुन्हे खालील प्रमाणे ०४ घरफोडीचे गुन्हे केल्याची माहीती दिली असून सदरचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं ५३४/२०२३ भा.दं. वि. कलम ४५७,३८०२) हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं ४२५/२०२३ भा.दं. वि. कलम ४५४,३८० ३) हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं ११८७/२०२३ भा.दं. वि. कलम ४५४,४५७,३८०४) हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं १०९०/२०२३ भा.दं. वि. कलम ४५४,४५७,३८०५) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १७९९/२०२३ भा.दं.वि.कलम ३७९
तसेच दुसऱ्या कारवाई मध्ये आरोपी नामे प्रणव प्रशांत शेजुळ वय १९ वर्ष रा. लोणी टोल नाक्याजवळ, कामठे वस्ती, लोणीकाळभोर मुळगाव श्रीगोंदा अहमदनगर यास हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १७९९/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करून त्याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली होंडा अॅक्टीवा एम.एच.१२.आर.बी ३७८१ किं. रू ५२,०००/- ची हस्तगत केली आहे.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा.पोलीस आयुक्त साो पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा साो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे सो, पोनि. (गुन्हे), श्री. संदीप शिवले साो, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समोर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, जोतीबा पवार, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबडे, सचिन गांरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रंजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.