भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्ह्यात धान पिकाची साठेबाजावर जोरदार कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे धान पिकाची साठेबाजी करणाऱ्या माफियाचे चांगलेच धागे दणाणले आहे.
भंडारा जिल्हातील आसाेला येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या धान पिकाची साठेबाजी सुरू असल्याची माहिती भंडारा जिल्हा पणन अधिकाऱ्या मिळाली होती त्यामुळे त्यांनी धान्य गोदामात पाहणी केली. त्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या धान पिकाची साठेबाजी केली असल्याचे दिसून आले. या प्रकरणी तीन लाखांचा दंड ठाेठावण्यात आला आहे.
पणन विभागांतर्गत खरेदी केंद्र चालक संस्थांना खरीप धान खरेदीचे निर्देश निर्गमित होण्यापूर्वीच काही केंद्र चालक संस्थांनी खरीप धानाची खरेदी करून अवैधरित्या धान पिकाची साठेबाजी केल्याचा आरोप होता.
याप्रकरणी जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चौकशी दरम्यान खरेदी केंद्र चालक संस्थेलगतच्या राईस मिल मधील गोदामात धान पिकाचा अवैध साठा आढळून आल्याने तब्बल तीन लाख 2 हजार रुपयांचा दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई भंडारा जिल्ह्याच्या आसोला येथील अनुप बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या आधारभूत खरेदी केंद्राच्या जवळील आशीर्वाद राईस मिलमध्ये करण्यात आली आहे. या गोदामात 4 हजार 400 क्विंटल धानाचा अवैध साठा आढळून आला. या कारवाईनंतर अवैधरित्या धान पिकाची अन्य ठिकाणी साठेबाजी केलेल्यांची तंतरली असल्याची चर्चा आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348 / 9766445347