अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं. 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -27 नोव्हेंबर:- सावनेर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवक जागृती मंडळाचे वतीने सावनेर बस स्थानक जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा येथे संविधान दिनानिमीत्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला विनम्र अभिवादन, सामुहिक बुद्ध वंदना व मिठाई चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते रामराव मोवाडे होते. तसेच कळमेश्वर कृऊबासचे सभापती बाबाराव पाटील, शिवसेना नेते उत्तम कापसे, पत्रकार सुधाकर बागडे, सोनु गव्हाने, विजय बागडे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव विक्की शेंडे, होमेश्वर डोंगरे, अंजली कनोजिया, बन्सोड ताई, निहारिका शेंडे, स्तुप बागडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

