पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- क्वॉन की – डो (मार्शल आर्ट) संघटना महाराष्ट्र व क्वॉन की – डो संघटना अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पहली राज्यस्तरीय “क्वॉन की – डो” मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन, शिर्डी, अहमदनगर येथे ९ ते १० डिसेंबर २०२३ ला करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सब जूनियर , जूनियर, व सीनियर एकूण २६ जिल्हयातील ५६० खेळाडू सहभाग घेतील. महाराष्ट्राचे अध्यक्ष शेख जाबिर, सचिव इकबाल शेख, नागपूर जिल्हा अध्यक्ष किरण यादव, सचिव खुशाल इंगोले, नईम शेख, मोविन विलियम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न होईल.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

