उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- समाज क्रांति आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे हे अकोला येथे दि.09 डिसेंबर 2023 रोजी होवू घातलेल्या समाज क्रांति आघाडीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रचार सभे निमीत्त राज्याध्यक्ष ॲड. श्रीकृष्ण टोबरे मुंबई व राज्य संघटक प्रा. दयावान गव्हाणे, संजय इंगळे संघटक मुर्तीजापूर तालुका व कार्यकर्ते देवेंद्र अटक यांचे समवेत मेळघाट दौ-यावर असून त्यांनी दि.02 डिसेंबर 2023 रोजी कारंजा (लाड) वरून मुर्तीजापूर, दर्यापूर, अकोट, अकोलखेड, येथील कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेवून व रात्री उशीरापर्यंत त्यांच्याशी सवीस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
दि.03-12-023 रोजी पोपटखेड, खटकली, ढाकणा, साव-या, बैराटिकी, भांडूम आणी दाबीया या अतीदुर्गम भागातील गावांना भेटी देवून आदिवासी कोरकू बांधव व नंद गवळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या; तेव्हा समाज क्रांति आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष व अकोलखेड गावचे सरपंच डिगांबर पिंप्राळे, डाॅ.प्रभाकर नगराळे, पत्रकार ललीत नगराळे, सुरेश दहीकर, दशरथ मावस्कर, रामसुख चीमोटे, प्रभाकर कासदेकर, सारंग तेलगोटे, रहिमभाई कुरेशी, मौलानाभाई, इरफान पठाण, शेख युनूस, रामभरोशे रावत, झणकलाल माणू कासदेकर, रामकीशन दारशिंबे, सुहनलाल धांदे इत्यादी सोबत होते.