समाजात संविधानिक मूल्ये रुजविण्यासाठी संविधान जागृती अभियान- प्रा.डॉ. दिशा गेडाम (समन्वयक- संविधान जागृती अभियान)
संविधान सर्व नागरिकांना एका सुत्रात जोडणारा दुवा- विनोद मोहतुरे (सहायक आयुक्त समाज कल्याण)
आमगांव तालुक्यातील करंजीच्या जिल्हा परिषद शाळेत 8 व्या वर्गात शिकणारी कु.नेहा हेमणे जूनियर श्रेणीत (18 वर्षाखाली) तर एस एस जे महाविद्यालय अर्जुनी मोरगांवचा प्रतीक चव्हाण सीनियर श्रेणीत (18 वर्षावरील) जिल्ह्यात प्रथम
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंदिया:- समाजात संविधानिक मूल्ये रुजविण्यासाठी जिल्ह्यात संविधान जागृती अभियान राबविण्यात येत आहे. युवा विद्यार्थी, महिला व नागरिकांना त्यांच्या हक्क अधिकारांची, देश हितार्थ कर्तव्यांची जाणीव असावी म्हणून संविधान गौरव प्रतियोगिता परिक्षा सारखे शैक्षणिक जागृती उपक्रम अभियानाअंतर्गत घेण्यात येत आहेत अशी माहिती आपल्या प्रास्ताविकेत प्रा. डॉ दिशा गेडाम ( संविधान जागृती अभियान जिल्हा समन्वयक) यांनी दिली तर विविध जाती वर्ग समुदायात विभागलेल्या या देशाच्या नागरिकांना एका सुत्रात जोडणारा दुवा म्हणजे संविधान आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाची अध्यक्षता करीत असलेले सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया विनोद मोहतुरे यानी केले.
संविधान मैत्री संघ व सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया तसेच जिल्ह्यातील विविध शाळा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव प्रतियोगिता परिक्षा-2023 चे पुरस्कार वितरण संविधान दिन निमित्ताने सामाजिक न्याय भवन सभागृह समाज कल्याण गोंदिया येथे उत्साहात पार पडले. यावेळी मंचावरून ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर ज्येष्ठ नागरिक वसंत गवळी, संविधान मैत्री संघाच्या पोर्णिमा नागदेवे, जूनियर कॉलेज प्राध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष पोर्मेंद्र कटरे, समीना खान, प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन समाज कल्याण विभागाचे जांभुळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संविधान मैत्री संघाचे सह संयोजक आदेश गणवीर यानी मानले.
मागील ऑक्टोबर महिन्यात आयोजित संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षेचे आयोजन जिल्ह्यातील सर्व 8 तालुक्यात 75 परीक्षा केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले होते. या परीक्षेत 4500 पेक्षा जास्त परीक्षार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचे निकाल जाहीर करून प्रत्येक तालुक्याला 6 नगद व 10 प्रोत्साहन पुरस्कार असे 16 पुरस्कार मिळून जिल्ह्यातील एकूण 128 विजेत्या परीक्षार्थीना 1.25 लाखाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाळा प्रशासन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, तसेच सहकार्य करणार्या कार्यकर्त्यांचा प्रशस्तिपत्र व पेन देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पुरस्कृत विद्यार्थी-
गोंदिया तालुका- जूनियर श्रेणी प्रथम -चिरंजीव नरेश करपते, द्वितीय- समीक्षा संजय नारनवरे, तृतीय -आकांक्षा रवींद्र तुरकर, सीनियर श्रेणी- प्रथम -परमेश्वरी धनलालजी चौधरी, द्वितीय -आशिष आय. रंगारी, तृतीय- प्रगती ऋषी चौव्हण,
आमगाव तालुका –जूनियर श्रेणी प्रथम- नेहा जगदीश हेमणे, द्वितीय- महक संजय तुमसरे, तृतीय- शितल मनोहर ब्राम्हणकर, सीनियर श्रेणी प्रथम- नेहा सुनिल मेश्राम, द्वितीय-विनोद रामेश्वर भांडारकर, तृतीय- प्रियंका मुलचंद बोपचे,
सालेकसा तालुका- जूनियर श्रेणी- प्रथम-आर्यन विलास बडोले, द्वितीय- चारूल पुरणदास वासनिक, तृतीय-शिल्पा कैलाश चुटे- सीनियर श्रेणी- प्रथम-रुपाली लक्ष्मण ढवरे, द्वितीय- कुणाल धनराज नोणारे, तृतीय-आरजु राजु शहारे
देवरी तालुका – जूनियर श्रेणी प्रथम- प्राजक्ता श्यामल सुखदेवे, द्वितीय- हिमानी नुरेश जनबंधु, तृतीय- कामिनी जगदीश उईके, सीनियर श्रेणी- प्रथम- सागर अजित खांडेकर, द्वितीय-उत्कर्ष गरिबा साखरे, तृतीय-परमानंद यशवंत अम्बादे,
तिरोडा तालुका- जूनियर श्रेणी प्रथम- दिक्षा जागेश्वर सोयाम, द्वितीय तृप्ती विलास शेंडे, तृतीय- आँचल सुभाष तुमसरे, सीनियर श्रेणी प्रथम- संजना ए. बोहणे, द्वितीय- रजनी राजेश बाणासुरे, तृतीय- सविता विजय सार्वे,
गोरेगाव तालुका-जूनियर श्रेणी मधुन प्रथम -नयन किशोर कुमार शहारे, द्वितीय- देवेंद्र राजेंद्र गणवीर , तृतीय – खुशी पुंजे, सीनियर श्रेणी प्रथम -छाया भीमराज राऊत, द्वितीय -सुरेश भाऊराव वालदे गिधाडी, तृतीय- रोहिणी चंभरू मौजे
सड़क अर्जुनी– जूनियर श्रेणी प्रथम- नितेश ज्ञानीराम कोडवते, द्वितीय-सांची विनोद टेंभुर्णे, तृतीय-गायत्री काशीनाथ उपरीकर, सीनियर श्रेणी- प्रथम- आरती पप्पुसिंह ठाकुर, द्वितीय- जयश्री हेमंतकुमार मेंढे, तृतीय- कृणाल अनिल दोनोडे
अर्जुनी मोरगांव तालुका- जूनियर श्रेणी प्रथम -मुस्कान आनंद दहिवले, द्वितीय- रज्जत तेजराम कांबळे, तृतीय -अनिकेत राजकुमार मोहुर्ले, सीनियर श्रेणी प्रथम -प्रतिक हेमराज चव्हाण, द्वितीय -मयुरी मुकेश गौतम, तृतीय-शारदा शंकर पटले
या यशस्वी संविधान गौरव परीक्षा विजेत्यांना तसेच परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, शाळा प्रशासनाला अगदी भरभरून शुभेच्छा देऊन सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया संविधान मैत्री संघ व शाळा प्रशासन तर्फे अभिनंदन करण्यात आले