मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगनघाट:- हिंगणघाट रेल्वे स्टेशन हे चेन्नई-मुंबई रेल्वे मार्गावरील स्टेशन आहे. कोरोना कालावधीत लॉकडाऊनपूर्वी हिंगणघाट स्टेशनवर लखनौ, अहिल्यानगरी, कोरबा, रायपूर, जोधपूर, बिकानेर (हिसरा), धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेसचा थांबा होता. मात्र कोरोना अनलॉक झाल्यानंतर सर्व रेल्वे गाड्या सुरू झाल्या असतांना पुर्वी असलेला हिंगणघाट रेल्वे स्थानकावर थांबा वगळण्यात आला, जवळपास 24 महिन्यांच्या कालावधी उलटूनही थांबा पुर्ववत न झाला या गाड्यांचा थांबा कधी सुरू होणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत असून यांच्याविषयी नागरिकांत रोष पहावयास मिळत आहे.
बल्लारशाह – मुंबई गाडी रोज सुरू करावी, बल्लारशाह – पुणे ही गाडी रोज सुरू करण्यात यावी, हिंगणघाट स्थानकावरील बंद करण्यात आलेले लखनौ, अहिल्यानगरी, कोरबा, रायपूर, जोधपूर, बिकानेर (हिसरा), धनबाद-कोल्हापूर या सर्व गाड्यांचे थांबे पुर्ववत सुरू करण्यात यावे, नागपूर – माजरी – आदिलाबाद व बल्लारशाह – भुसावल पॅसेंजर सुरू करण्यात यावी, हिंगणघाट रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बल्लारशाह स्टेशनवर पिठ लाईन लवकर सुरू करावे, नागपुर -बल्लारशाह सेक्शनमध्ये मेट्रो सुरू करावे, दक्षिणे कडे जाण्यासाठी फूट ब्रिज बांधावा आदी विविध मागण्यांसाठी वर्धा-बल्लारशाह यात्री संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार हंसराज अहीर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार रामदासजी तडस, आमदार समिरभाऊ कुणावार, जनरल मॅनेजर मुंबई यांना अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या समस्यांबाबत यश नाही आल्यामुळे हिंगणघाट रेल्वे स्टेशनवरील सर्व रेल्वे गाड्यांचे थांबे अजुनही पुर्ववत झाले नाही. यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी शैक्षणिक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी आम्ही वर्धा-बल्लारशाहा यात्री संघातर्फे रेल्वे प्रशासन व शासन यांच्याशी पत्र व्यवहार सुरू आहे पण अनुजही थांबा पुर्ववत न झाल्यामुळे लवकरच वर्धा-बल्लारशाहा यात्री संघ तसेच सामाजिक संघटनांतर्फे आंदोलनाचे पाऊल उचलु. व्हाईट गोल्ड नावानेच ओळखल्या जाणार्या शहराला रेल्वे थांबा नसणे हा आम्हा हिंगणघाट येथील नागरिकांवर मोठ्या अन्याय दुर करून या रेल्वे गाड्यांचा पुन्हा थांबा देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन देतांना यात्री संघाचे डि.के. गुरनुले, राजेश अ. कोचर, विजय मुथ्था, दिलीप बालपांडे, रवि जुमडे, चंद्रशेखर खापरे, शरद ढोक आदींची उपस्थिती होती. ही माहिती राजेश कोचर यांनी दिली.