दशरथ गायकवाड पुणे प्रतिनिधी
पुणे, दि.7 सप्टेंबर:- मोका गुन्हयातील आरोपी तुषार हंबीर व त्याचे संरक्षणासाठी असणारे पोलीसावर खुनी हल्ला करणारे आरोपीना पिस्टल, तलवारी व कोयत्यासह २४ तासांचे आत केली अटक पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे तुषार नामदेवराव बोर वय ३५ वर्षे रा. स. नं. १८, गाँवळेनगर, हडपसर, पुणे हे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील मोक्का केस नं ०६/२०१६ मध्ये सन २०१६ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहे.
त्यास उपचारकामी दिनांक २५ ऑगस्ट रोजी इन्फोसोस बिल्डींग, तौसरा मजला, ससून हॉस्पीटल, पुणे येथे अॅडमीट केले होते. दिनांक ०५/०९/२०२२ रोजी २१:३० वा. सुमारास इन्फोसीस बिल्डींग, तीसरा मजला, ससून हॉस्पीटल, पुणे. ठिकाणी ०५ अनोळखी इसमांनी तुधार हवीर उपचार घेत असलेल्या चामध्ये जावून आरोपीनी तलवार कोयते, व गावठी पिस्टर घेऊन तुषार हंबीर यास जिवे ठार मारण्याचे उध्देशाने त्याचेवर कोयत्याने वार करून पिस्टल मधुन दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तुषार हंबीर याचे संरक्षणा करीता नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी यांनी आरोपीना प्रतिबंध केल्याने आरोपी हातातील हत्यारासह पळून गेले. नमुद वेळी आरोपीना प्रतिबंध करणारे पोलीस कर्मचारी व तुषार देवीर याचा मेहुना शुभम रोड हातावर वार होऊन ते जखमी झाले तुषार हंबीर याने दिलेल्या तक्रारी वरुन बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४०/२०२२ भा.द.वि कलम ३०७, ३५३, ३३२, १२०(ब). १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४(२५) क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३, ७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर हे करीत आहेत.
गुन्हयाचे गांभीर्य ओळखून सागर पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ पुणे शहर यानी दिलेल्या सूचना नुसार प्रताप मानकर यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे दोन पथके तयार केली, त्या नुसार तपास पथकाने ससुन हॉस्पटल मधील सीसीटोकी फुटेजचे आधारे तसेच तांत्रिक विश्लेषनाचे आधार आरोपीचा शोध घेताना खात्रीशीर बातमी मिळाली की, आरोपी हे सध्या पानमळा सिंहगड रोड भागात असल्याने तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक राहुल पवार व त्यांचे पथकाने सापळा रचुन एकुण ०४ इसमांना दिनांक ०७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ताब्यात घेऊन त्यांचकडे चौकशी केली असता त्यांनी तुषार हंबीर याचबरोबर असलेल्या जुन्या भांडणाचे कारणावरून त्यास जिवे ठार मारण्यासाठी हल्ला केला होता अशी कबुली दिली. त्यांना त्यांची नावे पत्ते विचारता १) सागर हनुमंत ओव्हाळ वय २२ वर्षे रा. आकाशवाणी समोर, बनकर कॉलनी, स. नं. १३, शांतीनगर झोपडपट्टी, हडपसर, पुणे. २) बालाजी हनुमंत ओव्हाळ वय २३ वर्षे रा. आकाशवाणी समोर. बनकर कॉलनी. स. नं. १३. शांतीनगर झोपडपट्टी, हडपसर, पुणे, ३) सुरज मुक्तार शेख वय १९ वर्षे रा. हरपळे चाळ, भेकराई नगर, कुमार प्रॉपटी जवळ, हडपसर, पुणे, ४) सागर बाळासाहेब आटोळे वय २१ वर्ष रा. १० वा मेल, वज्रकी, लक्ष्मी वजन काट्या शेजारी, पुणे अशी असल्याचे सांगितले असुन त्यांचा या गुन्हयामध्ये सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक ७/०२/२०२२ रोजी पहाटे ०३.०० वाजता अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे तपास करून त्यांनी गुन्हयात वापरलेले गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक तलवार, एक पालपन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे पुणे शहरातील शरीरा विरुध्द गुन्हे करणारे अभिलेखा वरील गुन्हे करणारे गुन्हेगार असून गुन्हयातील फिर्यादी संतोष हवार हा सुध्दा खुन, दरोडा, खुनाचा प्रयत्न, अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे करणारा अभिलेखावरील गुन्हेगार आहह. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पूर्व वैमनस्य व गंगचे वर्चस्वा वरून सदरचा हल्ला केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले आहे.
नमुद कारवाई राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, सागर पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०२ आर. एन. राज, संपोआ लष्कर विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वपनि श्री प्रताप मानकर व श्रीमती अश्विनी पूर्व पोलीस निरीक्षक (गुन्हे), बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक राहुल पवार, अंमलदार मोहन काळे, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, सागर घोरपडे, मंगेश बो-हाडे, संजय वणवे, किरण तळेकर, शाना बडे, (मनोज भोकरे, सतिष मुंढे, शिवाजी सरक यांनी केली आहे

