उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला, दि.२०:- नागपूर हिवाळी अधिवेशन समाजक्रांती आघाडी मार्फत धडक मोर्चा संविधानिक मार्गाने जनतेचा आक्रोश, शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी हंसराज शेंडे, राष्ट्रीय अध्यक्ष, घटनेचे अभ्यासक यांच्या नेतृत्वात सामान्य जनतेच्या मुलभूत हक्काच्या खालील मागण्या असून त्या मान्य करुन जनतेस न्याय द्यावा करीता मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्च्यात हजारो संविधान प्रेमी समाज क्रांती आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर धडकले होते.
(१) इ.व्ही.एम. मशीन हटवून बॅलेट पेपरने मतदान घ्यावे.
(२) आजपर्यंत सरकारने निर्णय घेवून केलेले खाजगीकरण रद्द करून सर्व कार्यालये पूर्ववत सार्वजनिककरण (सरकारी) करावे.
(३) नसेल त्यांना जमीनी द्याव्या.
4) २०२३ पर्यंतचे सर्वच अतिक्रमणे नियमित करुन मालकी हक्काचे पट्टे द्यावे.
(५) जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
(६) शाळा बंदचे परिपत्रक रद्द करुन शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे.
(७) नोकर भरती करुन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा.
(८) सैन्य भरती अग्निपथ बंद करुन पूर्ववत असलेली जुनीच सैन्यभरती कायम करावी.
(९) कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू करून ज्यांचे वय ६० वर्षे पूर्ण झाली त्या सर्वच भारतीय नागरीकांना शेतकरी, कष्टकरी, शेतमजुर, मजुर यांना रुपये २५,०००/- दरमहा पेन्शन द्यावे.
(१०) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट रुपये ५०,०००/- नुकसान भरपाई द्यावी.
(११) भारतीय नागरीकांना शेतकरी, कष्टकरी, मजुर, शेतमजूर यांना गृपतिमा रुपये व करोडचा सरकारनी काढावा.
(१२) एन. टी. लो ८% वे मुसलमानांना ५% आरक्षण द्यावे.
(१३ जनतेच्या भावना व वास्तविकतेची जाण ठेवून संविधानाला अपेक्षीत असलेले कल्याणकारी राज्य निर्माण व्हावे, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा
१४) ग्रुपविमा रुपये एक करोडचा सरकारने काढावा
अशा विविध मागण्यासाठी यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी गोपाल उपाध्य, बी. जी. पाटील, प्रदीप फुलझेले, दयावान गव्हाणे, आर आर पाटील, विजय बनाई संजय काळे, अशोक वानखडे, आरपाटीत, विजय अवताडे, जयराम चिलात्रे, सुनील कासदेकर सह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते. समाज क्रांती आघाडिचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडुदादा वानखडे यांनी कळविले आहे.

