Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला: पोलिसाने केला पोलिसांच्या बायकोवर अत्याचार, मैत्री करुन जाळ्यात ओढत ब्लॅकमेल करून अत्याचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 20, 2023
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला: पोलिसाने केला पोलिसांच्या बायकोवर अत्याचार, मैत्री करुन जाळ्यात ओढत ब्लॅकमेल करून अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातून पोलिस खात्याला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे. येथे एका नराधम पोलीस कर्मचाऱ्याने सहकारी पोलिसांच्या पत्नीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. या नराधम पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या सहकारी पोलीस कर्माऱ्याच्या पत्नीसोबत आंधी मैत्री केली, त्यानंतर त्याने तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याची माहिती पुढे येत आहे.

अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलिस सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केला आहे. इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे. शिवम दुबे असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून असा त्याच्यावर सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आधी शिवमने पीड़ित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली, नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याचं तक्रारीत नमूद आहे. दीर्घ काळाने आरोपी ब्लॅकमेल करायला लागला असल्याचंही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेने अकोला पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तसेच मिळालेल्या माहितीनुसार, अकोला पोलिस दलात रामदास पेठ पोलिस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे (पोलिस कर्मचारी) हा कार्यरत होता. यादरम्यान, त्याची एका पोलिस कर्मचाऱ्यांशी चांगली मैत्री झाली. शिवम त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या म्हणजेच आपल्या मित्राच्या घरी येणं जाणं होतं. याचदरम्यान, त्याने मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली होती. शिवम या नराधम पोलिस कर्मचाऱ्यानं मित्राच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तिने ते मंजुरी केली आणि तिथून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

कालांतरानं शिवम मित्राच्या पत्नीला म्हणजेच पीडित महिलेला ब्लॅकमेल करू लागला. हा प्रकार तिने पतीला सांगितला आणि लागलीच आकोट शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सद्यस्थितीत शिवमवर आकोट शहर पोलिस ठाण्यात ५२६/२०२३ कलम ३५४, ३५४ (अ) ३५४ (ड) ३७६(१) (ए)३७६(२) (न) ३७६ (३) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास एपीआय योगिता ठाकरे करीत आहेत.

Previous Post

अवैध वाळू उपसा बंद करा वंचित बहुजन आघाडीची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी.

Next Post

समाज क्रांती आघाडीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर धडकला असंख्य नागरिकांचा मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समाज क्रांती आघाडीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर  धडकला असंख्य नागरिकांचा मोर्चा.

समाज क्रांती आघाडीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर धडकला असंख्य नागरिकांचा मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In